Join us
Daily Top 2Weekly Top 5

पहिले लग्न लपूनछपून केल्यानंतर गोविंदाने वयाच्या 49 व्या वर्षी पुन्हा केले होते लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 06:30 IST

गोविंदाने 49 व्या वर्षी पुन्हा लग्न करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता.

ठळक मुद्देगोविंदा आणि सुनीता यांनी लपूनछपून लग्न केले ही गोष्ट गोविंदाला पटली नव्हती. त्यामुळेच लग्नाच्या 25 व्या वाढदिवसाला त्यांनी धुमधडाक्यात सगळ्यांच्या उपस्थितीत पुन्हा लग्न केले होते. 

गोविंदाचे लग्न सुनीतासोबत ११ मार्च १९८७ ला झाले होते. सुनीता आणि गोविंदा यांनी अनेक वर्षांच्या अफेअरनंतर लग्न केले होते. गोविंदा आणि सुनीता यांना आजही अनेकवेळा एकत्र पाहायला मिळते. द कपिल शर्मा शो मध्ये काही महिन्यांपूर्वी ते दोघे झळकले होते. त्या दोघांची प्रेमकथा खूपच रंजक असून त्यांच्या लग्नाचा किस्सा देखील इंटरेस्टिंग आहे.

सुनीता आणि गोविंदा यांच्या प्रेमकथेविषयी बॉलिवूडलाइफने दिलेल्या वृत्तानुसार, सुनीताच्या मोठ्या बहिणीचे गोविंदाच्या मामासोबत झाले होते. त्यामुळे आपल्या बहिणीला भेटण्यासाठी सुनीता अनेकवेळा त्यांच्या घरी यायची. ते दोघे त्यावेळी खूपच लहान होते. त्यामुळे ते दोघे प्रचंड भांडायचे. त्या दोघांचा स्वभाव एकमेकांपेक्षा खूपच वेगळा होता. गोविंदाला सुनीता खूपच उद्धट वाटायची. 

गोविंदा आणि सुनीता यांना दोघांनाही नृत्याची आवड होती. त्यामुळे गोविंदाचे मामा सुनीता आणि गोविंदाला डान्सची कॉम्पिटिशन करायला सांगायचे. पण सुनीता ही हाय सोसायटीमधील असल्याने गोविंदासोबत स्पर्धा करणे तिला पटत नसे. पण याच भांडणातून त्यांच्यात प्रेम फुलत गेले. त्यावेळी फोनचे प्रमाण खूपच कमी असल्याने ते दोघे एकमेकांना प्रेमपत्र लिहित असत. ही पत्र पोहोचण्याचे काम सुनीताचा भाऊ करत असे. पण एकदा हे पत्र सुनीताच्या आईच्या हातात लागले. त्या पत्रात सुनीताने तिला गोविंदासोबत लवकरात लवकर लग्न करायचे आहे असे लिहिले होते. गोविंदाची आई निर्मिला देवी यांना देखील सुनीता खूप आवडायची. त्यामुळे त्या दोघांच्या घरातल्यांनी लगेचच या लग्नासाठी होकार दिला. 

सुनीता आणि गोविंदा यांनी घरातील अगदी जवळच्या लोकांच्या उपस्थितीत मंदिरात लग्न केले होते. हे लग्न त्यांनी सगळ्यांपासून वर्षभर लपवले होते. गोविंदा त्याकाळात अभिनेता म्हणून नुकतेच आपले स्थान निर्माण करत होता. त्यामुळे त्याच्या लग्नाबद्दल त्याच्या फॅन्सला कळले तर त्याच्या महिला चाहत्यांचे प्रमाण कमी होईल असे त्याला वाटत होते. त्यामुळेच त्यांची मोठी मुलगी नम्रताच्या जन्मापर्यंत त्यांनी ही गोष्ट कोणालाच सांगितली नव्हती. गोविंदा आणि सुनीता यांनी लपूनछपून लग्न केले ही गोष्ट गोविंदाला पटली नव्हती. त्यामुळेच लग्नाच्या 25 व्या वाढदिवसाला त्यांनी धुमधडाक्यात सगळ्यांच्या उपस्थितीत पुन्हा लग्न केले होते. 

टॅग्स :गोविंदा