झिम्मा २ (Jhimma 2 Movie) चित्रपट २०२३ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाला फक्त महिला वर्गच नाही तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकानेच भरभरुन प्रेम दिलं. सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरु या मुख्य भूमिका साकारलेल्या सर्व अभिनेत्रींवर कौतुकाचा वर्षाव झाला. बॉक्स ऑफिस गाजवलेला हा चित्रपट १८ मे रोजी सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे. इरावती कर्णिक लिखित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्मा २ चित्रपटसुद्धा पहिल्या भागाप्रमाणेच प्रत्येकाच्या मनात एक नवीन उमेद निर्माण करेल यात शंका नाही.
सात बायकांच्या धम्माल ट्रिपची गोष्ट सांगणारा 'झिम्मा' चित्रपट २०२१मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यानंतर २०२३मध्ये या चित्रपटाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला आला. 'झिम्मा' प्रमाणेच 'झिम्मा २' सिनेमालादेखील प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळाला. पण, रुपेरी पडदा गाजवलेला हा सिनेमा अद्याप ओटीटी आणि टेलिव्हिजनवर प्रदर्शित झाला नाही. पण आता प्रेक्षकांसाठी खूशखबर आहे. लवकरच 'झिम्मा २' सिनेमा आता घरबसल्या टीव्हीवर पाहता येणार आहे.
'झिम्मा २' या दिवशी येणार भेटीला
हेमंत ढोमेचं दिग्दर्शन असलेला 'झिम्मा २' २४ नोव्हेंबर २०२३ रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज करण्यात आला होता. आता तब्बल दीड वर्षांनी हा सिनेमा छोट्या पडद्यावर दाखल होत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर 'झिम्मा २'चं वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर होत आहे. येत्या १८ मे रोजी 'झिम्मा २' स्टार प्रवाहवर संध्याकाळी ७ वाजता हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासोबत पाहता येणार आहे.