Join us  

"लोकांना 'लंका जला देंगे'शी प्रॉब्लेम आहे, पण 'अपना टाइम आएगा' चालतं", 'आदिपुरुष'चे लेखक मनोज मुंतशीर यांचं वक्तव्य चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 11:17 AM

"मला या गाण्यांशी कोणताच प्रॉब्लेम नाही, पण...", मनोज मुंतशीर यांचं वक्तव्य

रामायणावर आधारित असलेला 'आदिपुरुष' चित्रपट काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान मुख्य भूमिकेत असलेल्या 'आदिपुरुष'मधील व्हीएफएक्स आणि संवादावरुन वाद निर्माण झाला होता. त्यानंतर 'आदिपुरुष'मधील संवादात बदल करण्यात आले होते. आता 'आदिपुरुष'चे लेखक मनोज मुंतशीर यांनी पुन्हा याबाबत वक्तव्य केलं आहे. 

२०२०मध्ये झालेल्या ६५ व्या फिल्मफेअर अवॉर्डमध्ये केसरी चित्रपटातील 'तेरी मिट्टी मे' या गाण्याला नामांकन सर्वोत्कृष्ट गाणं या कॅटेगरीत मिळालं होतं. हे गाणं मनोज मुंतीशीर यांनी लिहिलं होतं. पण, 'गली बॉय'मधील अपना टाइम आयेगा या गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार मिळाला. हे गाणं डिवाइन आणि अंकित तिवारी यांनी लिहिलं आहे. याबाबत मुंतशीर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. "त्या अवॉर्ड सोहळ्यात अनेक चांगल्या गाण्यांना नॉमिनेशन्स मिळाली होती. पण, अशा गाण्याला अवॉर्ड मिळाला जे गाणं गीतकाराच्या चौकटीत बसत नाही," असं मुंतशीर 'लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. 

पुढे ते म्हणाले, "आजपर्यंत एक श्रोता म्हणून मला रॅप साँग पटलेली नाहीत. मला या गाण्यांशी कोणताच प्रॉब्लेम नाही. मी गली बॉयमधील गाणी ऐकली आहेत. ती सगळी चांगली आहेत. लोकांना माझ्या लंका जला देंगे संवादाशी प्रॉब्लेम होता. पण, नंगा ही तो आया था घंटा लेकर जाएगा हे त्यांना चालतं. मला वाटतं हे चुकीचं आहे." 

टॅग्स :आदिपुरूषगली ब्वॉयसिनेमा