Join us  

अदा शर्माने दिली तब्येतीबाबत अपडेट, म्हणाली, "सावधान, हिंमत असेल तरच..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2023 4:35 PM

फुल स्लीव्ह्ज कपडे घालून मी फिरत आता समोर येणार आहे.

'द केरळ स्टोरी' फेम अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) सिनेमाच्या यशानंतर नवीन प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त झाली. लवकरच ती 'कमांडो' सिनेमात दिसणार आहे. 'कमांडो'चे प्रमोशन सुरु होणार तितक्यात अदा रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी आली आणि चाहते काळजीत पडले. मात्र अदाला नक्की झालं तरी काय हे कोणालाच कळलं नव्हतं. आता अदाने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे.

अदाला अॅलर्जी झाली असून तिच्या त्वचेवर जागोजागी रॅश आली आहे. चाहत्यांना सावध करत त्याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर अपलोड केले आहेत. फुल स्लीव्ह्जचे कपडे घालून आता प्रमोशन करणार असल्याचं ती म्हणाली. अदाने लांबलचक कॅप्शन लिहित तब्येतीची माहिती दिली आहे

काय आहे अदाची पोस्ट?

सगळ्यांचे आभार, कुठून कुठून मला मेसेजेस आले. ज्यांना मी कित्येक वर्षांत भेटलेही नाही त्यांचे फोन आले. तसंच अदा फॅन क्लबचेही आभार. सावधान: त्वचेवरील रॅशला घाबरत असाल तर स्वाईप करुन फोटो पाहू नका. थोडे भीतीदायक फोटो आहेत. पण मला वाटलं की फक्त सुंदर फोटोच का अपलोड करायचे.

काही दिवसांपासून माझी तब्येत बरी नाही. रॅश आले आहेत. त्यामुळे फुल स्लीव्ह्ज घालून लपवत आहे. चेहऱ्यावरही आले. टेन्शनमुळे. मग मी औषध घेतलं पण मला औषधाचीच अॅलर्जी झाली. खूप उलटी झाली. मग एक दुसरं औषध आणि इन्जेक्शन, फुल स्लीव्ह्ज आणि पायांना कव्हर करुन मी आजपासून प्रमोशन करणार आहे.

यानंतर मी आईला वचन दिलंय की मी माझ्या तब्येतीची काळजी घेईन. तर उद्या मी काही दिवसांसाठी बाहेर पडत आहे. आई म्हणाली, रेडिओ ट्रेल्स, झूम इंटरव्ह्यू, प्रोमो शूट सगळं झालं आता तब्येतीकडे लक्ष दे. मी आयुर्वेदिक उपचार घेणार आहे. लवकरच परत येईन. तोपर्यंत कमांडोचे बिहाइंड द सीन्स इन्स्टावर अपडेट करत राहीन. भावना रेड्डी रेडी आहेस ना आपला पुढचा प्रोजेक्ट याच महिन्यात सुरु होतोय. ते काय म्हणतात फिंगर्स क्रॉस.'

अदा लवकर बरी व्हावी म्हणून चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. कठीण परिस्थितीतही अदा सकारात्मक राहत आहे. लवकरच ती प्रमोशन करताना दिसेल. 'कमांडो ३' मध्ये विद्युत जामवालसोबत तिनेही अॅक्शन सीन्स दिले आहेत. 

टॅग्स :अदा शर्माबॉलिवूडकमांडोहॉस्पिटल