Join us  

‘या’ अभिनेत्रींचा पहिला चित्रपट हिट, नंतरचे करिअर मात्र फ्लॉप !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 12:55 PM

बॉलिवूडमध्ये अशाही अभिनेत्री होत्या, ज्यांना एकाच चित्रपटाने रातोरात्र स्टार बनविले तर काहींचे करिअर असे संपुष्टात आले की त्यांना आज काम मिळणे खूपच कठीण झाले आहे. हो, बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या पहिल्याच चित्रपटातून खूपच प्रसिद्धी मिळविली, मात्र सध्या त्यांना काम मिळत नाहीय.

- रवींद्र मोरेबॉलिवूडमध्ये अशाही अभिनेत्री होत्या, ज्यांना एकाच चित्रपटाने रातोरात्र स्टार बनविले तर काहींचे करिअर असे संपुष्टात आले की त्यांना आज काम मिळणे खूपच कठीण झाले आहे. हो, बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या पहिल्याच चित्रपटातून खूपच प्रसिद्धी मिळविली, मात्र सध्या त्यांना काम मिळत नाहीय. आज आपण अशाच काही अभिनेत्रींविषयी जाणून घेऊया...* शमिता शेट्टीशमिता शेट्टी बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री असून एकेकाळची सुपरहिट अभिनेत्री शिल्पाची बहीण आहे. शमिताने तिच्या करिअरची सुरुवात ‘मोहब्बतें’ या चित्रपटातून केली होती. हा चित्रपट २००० मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट त्यावेळी सुपरड्यूपर हिट झाला होता. या चित्रपटातील शमिताच्या कामाबद्दल तिचे खूपच कौतुकही झाले होते. या चित्रपटानंतर शमिताला बऱ्याच चित्रपटात काम मिळाले मात्र तिच्या पदरी निराशाच पडली. आता तिला कोणत्याच चित्रपटात काम मिळत नाहीय.* आयशा टाकियाकाम न मिळणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत आयशा टाकियाचे नावदेखील आहे. आयशाने तिचा डेब्यू २००४ मध्ये 'टार्जन द वंडर कार' या चित्रपटाद्वारा केला होता. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक सर्वत्र झाले होते. त्यानंतर ती बऱ्याच चित्रपटात दिसली, मात्र सलमान खानसोबतच्या ‘वांटेड’ हा चित्रपट सोडला तर तिला कोणत्याच चित्रपटात यश मिळाले नाही. सध्या तिला काम मिळत नसल्याने बºयाच काळापासून ती पडद्यापासून दूर आहे.* अमृता अरोराअमृता अरोराने आपल्या करिअरची सुरूवात अभिनेता फरदिन खानसोबत 'कितने दूर कितने पास' या चित्रपटातून केली होती. हा चित्रपट २००२ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटातील तिच्या उल्लेखनिय कामाबद्दल तिला अनेक चित्रपटही मिळाले, मात्र हा चित्रपटात तिची जादू ओसरताना दिसली. सध्या तिच परिस्थिती असून तिच्याजवळ आज एकही चित्रपट नाहीय.* किम शर्माअभिनेत्री किम शर्मा पहिल्यांदाच ‘मोहब्बतें’ मध्ये दिसली होती. या चित्रपटानंतर किमने लाखो लोकांच्या मनात स्थान निर्माण केले होते, मात्र बॉलिवूडमध्ये तिचे चित्रपट करिअर जास्त काळ टिकू शकले नाही. २००९ मध्ये आलेला ‘मगधीरा’ या चित्रपटानंतर ती कोणत्याच चित्रपटात दिसली नाही. सध्या ती कामाच्या शोधात असून तिच्या हातात एकही चित्रपट नाहीय.* मयूरी कांगोमयूरी कांगो बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने तिच्या चित्रपट करिअरची सुरुवात १९९५ मध्ये ‘नसीम’ या चित्रपटाद्वारा केली होती. या चित्रपटातील तिच्या कामामुळे तिने खूपच प्रशंसा मिळविली होती. त्यानंतर तिला बऱ्याच चित्रपटात काम मिळाले, मात्र अपेक्षित यश मिळाले नाही. सध्या तिच्या हातात एकही चित्रपट नाहीय.

टॅग्स :आयशा टाकियाकिम शर्मा