कलर्स वाहिनीवरील लोकप्रिय हिंदी रिएलिटी शो 'बिग बॉस'च्या बाराव्या सीझनचे अनावरण गोव्यात नुकतेच पार पडले. तेव्हापासून या शोमध्ये स्पर्धक कोण असणार याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे. स्पर्धकांबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. त्यात आता या शोमध्ये आशिक बनाया आपने फेम अभिनेत्री तनुश्री दत्ता सहभागी होणार असल्याची चर्चा खूप रंगली होती. मात्र तिने याबाबत खुलासा केला असून तिने ही निव्वळ अफवा असल्याचे म्हटले आहे.तनुश्री दत्ता आपल्या कुटुंबासोबत सुट्टी व्यतित करून मुंबईत परतली आहे. तिने याबाबत सांगितले की, 'मी आणि इशिता आम्हा दोघांनाही बिग बॉसमध्ये सहभागी होण्याबद्दल विचारले देखील नाही. आम्ही बिग बॉसच्या घरात जाणार ही निव्वळ अफवा आहे, कोणीतरी लोकांना फसवत आहे आणि मला हा व्यक्ती कोण आहे हे जाणून घ्यायचे आहे. 'प्रेक्षक व प्रसार माध्यम मी कमबॅक करते आहे हे ऐकल्यापासून एवढे प्रेम व पाठिंबा देत आहे, हे पाहून मी भारावून गेल्याचे तनुश्री म्हणाली.'बिग बॉस' या कायक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन हिट झाले आहेत. या कार्यक्रमाच्या गेल्या सिझनची विजेती शिल्पा शिंदे ठरली होती. यंदाच्या सिझनमध्ये स्पर्धक एकटे नसून जोड्यांमध्ये येणार आहेत. ही जोडी पती-पत्नी, मुलगा-मुलगी कोणाचीही असू शकते. तथापि, बिग बॉस 12 आता जोडीची संकल्पनाच बदलण्यासाठी सज्ज झाला आहे. कारण त्यांची थीमच आहे विचित्र जोड्या. सासू-सून, मामा-भाचा, मालक-नोकर अशा विविध जोड्या या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.
'बिग बॉस' सीझन १२ मध्ये ही अभिनेत्री होणार नाही सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 18:26 IST
कलर्स वाहिनीवरील लोकप्रिय हिंदी रिएलिटी शो 'बिग बॉस'च्या बाराव्या सीझनचे अनावरण गोव्यात नुकतेच पार पडले.
'बिग बॉस' सीझन १२ मध्ये ही अभिनेत्री होणार नाही सहभागी
ठळक मुद्देतनुश्री व इशिता दोघेही बिग बॉसमध्ये होणार नाहीत सहभागी