Join us  

अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि विजय वर्माचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 7:41 PM

'बाहुबली' अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि 'डार्लिंग्स' फेम अभिनेता विजय वर्मा यांचा एक क्युट व्हिडीओ समोर आला आहे. 

'बाहुबली' अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि 'डार्लिंग्स' फेम अभिनेता विजय वर्मा हे सध्या बी-टाऊनमधील सर्वात चर्चेत असलेल्या कपल्सपैकी एक आहेत.  काही दिवसांपूर्वी तमन्नाने विजयबरोबरच्या नात्याची कबुली सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. त्यानंतर ते अनेकदा एकत्र दिसले. अशातच त्यांचा एक क्युट व्हिडीओ समोर आला आहे. 

मुंबईत 'ओटीटी इंडिया फेस्ट २०२३'चे आयोजन बांद्रा येथील ताज हॉटेलमध्ये करण्यात आले.  बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमाला विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया देखील हजर होते. कार्यक्रमात ब्रेस्ट कॅन्सरविषयी समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी पिंक रिबीनचा वापर करण्यात आला. सर्व सेलिब्रिटींनी त्यांच्या कपड्यांवर पिंक रिबीन लावली होती.

विजय वर्माने ही  रिबीन आपल्या कपड्यांवर लावली होती. पापाराझींसमोर तमन्ना भाटियासोबत पोज देताना त्याची रिबीन खाली पडली. तेवढ्यात तमन्ना खाली वाकून रिबीन उचलली आणि विजयच्या जॅकेटला लावली. दोघांचे हे गोड क्षण कॅमेऱ्यात कैद झाले. दोघांमधील हे प्रेम चाहत्यांना खूप आवडलं. तमन्ना आणि विजयचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. 'ही जोडी बेस्ट आहे', 'ते एकत्र खूप छान दिसतात', 'या दोघांना नजर न लागो' अशा कमेंट नेटकरी करत आहेत.

वर्ष २०२३ चे स्वागत करताना विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांचा किसिंग व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तेव्हापासून त्यांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर ‘लस्ट स्टोरी २’ च्या प्रमोशन दरम्यान, विजय आणि तमन्ना एकमेकांना डेट करत असल्याचं स्पष्ट झालं होतं. बॉलीवूडच्या या नव्या जोडीला चाहत्यांनीही पसंती दिली आहे.

टॅग्स :तमन्ना भाटियाबॉलिवूडसेलिब्रिटी