Join us

एकेकाळी बॉलिवूड गाजवलं; सैफबरोबरही केलंय काम, आता इतकी बदलली की अभिनेत्री ओळखूही येत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 18:12 IST

मराठी अभिनेत्रीने शेअर केले २७ वर्ष जुने फोटो, तुम्ही ओळखलं का?

नेक सेलिब्रिटी आणि कलाकारांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आपले आवडत्या कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी चाहतेही उत्सुक असतात. त्यांचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतात. अलिकडेच पार पडलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील अभिनेत्री छाया कदम यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आता अशाच एका फेस्टिव्हलमधील मराठमोळ्या अभिनेत्रीच्या जुन्या फोटोंनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

सध्या सोशल मीडियावर बॉलिवूड गाजवलेल्या एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा आहे. या फोटोत साडी नेसून अभिनेत्रीने खास पोझ दिलेल्या पाहायला मिळत आहे. तिचे हे ब्लॅक अँड व्हाइट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पहिल्या फोटोत केस मोकळे सोडलेल्या या अभिनेत्रीच्या कपाळावर लांब टिकली दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत साडी नेसून अभिनेत्रीने एकदम साधा मेकअप करत पोझ दिल्याचं दिसत आहे. आता ही अभिनेत्री मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तिच्या अभिनय कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळातील हे फोटो आहेत. हे फोटो पाहून अभिनेत्रीला ओळखणंही कठीण झालं आहे. 

फोटोत दिसणारी ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून मराठमोळी सोनाली कुलकर्णी आहे. सोनालीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन हे फोटो शेअर केले आहेत. १९९६ सालातील इटली येथे झालेल्या एका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमधील हे फोटो असल्याचं तिने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. "मेजर थ्रोबॅक. मला फोटोग्राफरच नाव लक्षात असतं तर...", असं म्हणत सोनालीने हे फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. या फोटोंवर सेलिब्रिटींनीही कमेंट केल्या आहेत. 

सोनाली ही मराठी सिनेसृष्टीतील एक गुणी अभिनेत्री आहे. तिने आजवर अनेक सिनेमांमध्ये विविधांगी भूमिका साकारून अभिनयाची छाप पाडली आहे. केवळ मराठीच नाही तर हिंदी सिनेमांमध्येही सोनालीने तिच्या अभिनयाची जादू दाखवली. दिल चाहता है, टॅक्सी नं ९ २ ११, सिंघम, प्यार तुने क्या किया या बॉलिवूड सिनेमांमध्ये ती झळकली. 

टॅग्स :सोनाली कुलकर्णीसेलिब्रिटी