Join us

गुडन्यूज! सागरिका घाटगे आणि झहीर खान झाले आईबाबा, बाळाची पहिली झलक दाखवत नावही सांगितलं

By कोमल खांबे | Updated: April 16, 2025 11:15 IST

क्रिकेट आणि मनोरंजन विश्वातील आणखी एका सेलिब्रिटी कपलने गुडन्यूज दिली आहे. अभिनेत्री सागरिका घाटगे आणि क्रिकेटर झहीर खान आईबाबा झाले आहेत.

अलिकडेच केएल राहुल आणि अथिया शेट्टी आईबाबा झाले. अथियाने गोंडस लेकीला जन्म दिला. त्यानंतर आता क्रिकेट आणि मनोरंजन विश्वातील आणखी एका सेलिब्रिटी कपलने गुडन्यूज दिली आहे. अभिनेत्री सागरिका घाटगे आणि क्रिकेटर झहीर खान आईबाबा झाले आहेत. सोशल मीडियावरुन त्यांनी ही बातमी शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. 

सागरिका आणि झहीरला पुत्ररत्नानी प्राप्ती झाली आहे. सागरिकाने बाळाची पहिली झलक दाखवत एक फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. यामध्ये तिने बाळाचं नावंही सांगितलं आहे. सागरिका आणि झहीरने त्यांच्या लाडक्या लेकाचं नाव फतेहसिन्ह खान असं ठेवलं आहे. "प्रेम, प्रार्थना आणि कृतज्ञतेच्या भावनेने आम्ही आमच्या लाडक्या लेकाचं स्वागत करत आहोत", असं सागरिकाने पोस्टमध्ये म्हटलं आहे. सागरिकाच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहे. 

अभिनेत्री सागरिकाने २०१७ मध्ये क्रिकेटर असलेल्या झहीर खानशी लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. लग्नानंतर ८ वर्षांनी त्यांच्या घरात पाळणा हलला आहे. ३९व्या वर्षी सागरिका पहिल्यांदा आई झाली आहे. त्यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. 

टॅग्स :सागरिका घाटगेझहीर खानसेलिब्रिटी