Join us  

'या' कारणामुळे प्राजक्ताने सोडलं 'शिवपुत्र संभाजी' नाटक; कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 12:33 PM

Prajakta gaikwad: प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला असून यात तिने नाटक सोडण्यामागचं कारण स्पष्ट होत आहे.

जगदंब क्रिएशनचं शिवपुत्र संभाजी या महानाट्यामधून अलिकडेच अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने काढता पाय घेतला. प्राजक्ताच्या जाण्यामुळे या नाटकात अभिनेत्री स्नेहलता वसईकर ही सध्या येसूबाईची भूमिका साकारत आहे. मात्र, प्राजक्ताने अचानकपणे या नाटकातून बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला हा प्रश्न अनेकांना पडला होता. या प्रश्नाचं उत्तरं अलिकडेच प्राजक्ताने एका पोस्टच्या माध्यमातून दिलं आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या प्राजक्ताने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिने नव्या सिनेमाचा शुभारंभ केल्याचं दिसत आहे. त्यामुळे या नव्या सिनेमासाठी तिने शिवपुत्र संभाजी हे महानाट्य सोडल्याचं सांगण्यात येतं.

प्राजक्ताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती गणपतीची पूजा करताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ एका सेटवरचा असून याविषयी तिने कॅप्शनमध्येही तसं नमूद केलं आहे. बाप्पा मोरया..नवीन सिनेमा..सुरुवात असं तिने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, प्राजक्ताच्या या नव्या सिनेमाचं हैदराबादमध्ये शुटिंग सुरु आहे. शिवपुत्र संभाजी या महानाट्यामध्ये प्राजक्ता येसूबाईची भूमिका साकारत होती. तर अभिनेता डॉ. अमोल कोल्हे मध्यवर्ती भूमिका साकारत आहेत. 

टॅग्स :प्राजक्ता गायकवाडनाटकसेलिब्रिटीडॉ अमोल कोल्हे