अभिनेत्री कनिष्का सोनी ही नेहमीच चर्चेत असते. याआधी कनिष्काने सोशल मीडियावरून एक खूशखबर दिली होती. लग्न केल्याचं सांगितलं पण विशेष म्हणजे तिने दुसऱ्या कोणाशी नाही तर स्वतःशीच लग्न केलं आहे. तिच्या या हटके लग्नामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ती नेहमीच आपले नवनवीन फोटो हे शेअर करत असते. कनिष्का आता न्यूयॉर्कमध्ये राहते. सध्या तिचा एक फोटो व्हायरल होत असून ती प्रेग्नंट असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
कनिष्का सोनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती एका पार्कमध्ये चिल करताना दिसत आहे. तिने घातलेल्या टॉपमधून तिचं पोट थोडं वाढलेलं पाहायला मिळतं. त्यामुळेच सध्या ती प्रेग्नेंट असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. पण आता कनिष्काने याबाबत मोठा खुलासा केला आहे. चाहते आपल्या बेली फॅटला बेबी बंप समजू नये यासाठी तिने आता स्वत:च स्पष्टीकरण दिलं आहे.
कनिष्का सोनीने आणखी एक पोस्ट केली असून तिच्या नवीन पोस्टमध्ये वाढलेल्या पोटाबाबत स्पष्टीकरण दिले आहे की, लोकांनी याला बेबी बंप समजू नये. ''मी स्वतःशीच लग्न केलं म्हणून मी स्वतःच प्रेग्नेंट आहे असं नाही. हा फक्त पिझ्झा व बर्गरचा परिणाम आहे. हे सर्व पदार्थ खाऊन माझं वजन वाढलं आहे. पण हे पदार्थ माझ्या आवडीचे आहेत" असं म्हटलं आहे. यामुळे आता कनिष्का प्रेग्नेंट असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
कनिष्काने अनेक लोकप्रिय टीव्ही शोमध्ये काम केले आहे. यामध्ये पवित्र रिश्ता, दिया और बाती हम, देवों के देव...महादेव, दो दिल एक जान यांचा समावेश आहे. 2007 मध्ये तिने 'बाथरूम सिंगर' या सिंगिंग रिएलिटी शोमधून करिअरला सुरुवात केली. ती 'खतरों के खिलाडी 2' ची पाहुणी स्पर्धक राहिली आहे. कनिष्काने साऊथ चित्रपटांमध्येही काम केले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"