Join us
Daily Top 2Weekly Top 5

ही अभिनेत्री एक महिन्यापासून आहे रुग्णालयात, मुलगा फोनही उचलेना

By admin | Updated: May 29, 2017 19:04 IST

100 पेक्षा अधिक चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्री गिता कपूरवर सध्या दुखाचा डोंगर कोसळला आहे

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 29 - 100 पेक्षा अधिक चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्री गिता कपूरवर सध्या दुखाचा डोंगर कोसळला आहे. गिता कपूर यांना एका महिन्यापूर्वी त्यांच्या पोटचा मुलाने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठीही पैसे नसल्याने त्यांना एकटं सोडून त्यांच्या मुलाने पळ काढला आहे. तो गिताचा अथवा हॉस्पिटलचा साधा कॉलही उचलत नाही. पाकिजा सारख्या चित्रपटात दमदार अभिनय करणारी ज्येष्ठ अभिनेत्री गीता कपूर आज आर्थिक विवंचनेत सापडली आहे. आजाराने ग्रासलेल्या गीता कपूर रूग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे एकेकाळी मोठा पडदा गाजवलेल्या या अभिनेत्रीच्या वाट्याला वृद्धापकाळात एकाकीपणाला सामोरे जावं लागत आहे.21 एप्रिल रोजी कमी रक्तदाबाचा त्रास होत असल्याने रेगावमधील एसआरव्ही हॉस्पिटलमध्ये गीता कपूर यांना दाखल करण्यात आले. त्यांचा मुलगा राजा कपूरने त्यांना रुग्णालयात दाखल केले आणि तिथून तो पसार झाला तो अजून आलाच नाही. महत्त्वाचं म्हणजे ज्या घरात तो राहत होता, ते घरही तो सोडून गेला आहे.एकीकडे गीता यांचे कुटुंब त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असताना निर्माते रमेश तौरानी यांनी पुढे येत रुग्णालयाचे बिल भरले आहे. त्यामुळे गीता यांना डिसचार्ज मिळाला असल्याचेही रुग्णालयाकडून सांगण्यात आले. मात्र आता गीता यांची केस पोलिसांकडे गेली असून त्यांना वृद्धाश्रमात ठेवण्याबाबत पोलीस निर्णय घेतील असेही रुग्णालय प्रशासनाने सांगितले.गीता कपूर एक महिन्यापेक्षा जास्त काळ रुग्णालयात असल्याने दीड लाख रूपये बिल झालं आहे. आता गीता कपूर यांची तब्येत सुधारली आहे. हॉस्पिटल त्यांना डिस्चार्ज द्यायलाही तयार आहे. प्रशासन राजा कपूर आणि गीता यांची मुलगी पूजा यांना मागील एक महिन्यापासून संपर्क करत आहेत. मात्र त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळाले नसल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.राजा त्यांना मागील काही दिवसांपासून त्रास देत होता. वृद्धाश्रमात जाण्यास नकार दिल्याने त्याने 3 ते 4 दिवस काहीही खायला न देता दवाखान्यात नेण्याचा बहाणा केला आणि अशापद्धतीने इथे सोडून पळून गेला, असा आरोप गीता यांनी केला आहे.