Join us  

अभिनेत्री यामी गौतमच्या पोल डान्सची सोशल मीडियात चर्चा, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2018 12:28 PM

अभिनेत्री यामी गौतमचा पोल डान्स सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे. 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडच्या अभिनेत्री पोल डान्सच्या चांगल्याच मागे लागल्याचे दिसते. जॅकलिन फर्नांडिसनंतर आता अभिनेत्री यामी गौतमचा पोल डान्स सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे. 

आपलं फिटनेस चांगलं ठेवण्यासाठी यामी सध्या जिम आणि वॉटर योगाचे धडे घेत आहे. त्यात तिने आता पोल डान्सही सुरु केला आहे. यामीने आरीफा भिंडेरवाला याच्याकडे पोल डान्सचा क्लास लावला आहे. पोल डान्सची नुकतीच सुरुवात तिने केली असून त्याचा एक व्हिडिओही इन्टाग्रामवर शेअर केला आहे. 

गुरुवारी यामी हा व्हिडिओ शेअर केला होता. यामीच्या चाहत्यांना तिचा हा पोल डान्स चांगलाच आवडलेला दिसतोय. कारण आत्तापर्यंत 283,348 लोकांनी हा व्हिडीओ पाहीला आहे.

यामी गौतम ही नुकतीच सरकार 3 या सिनेमात दिसली होती. त्यानंतर आत्ता ती या धमाकेदार व्हिडीओने चांगलाच धुमाकूळ घालत आहे. 

टॅग्स :बॉलिवूडयामी गौतम