Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेता स्वप्नील जोशीचं गुजराती सिनेइंडस्ट्रीत पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 13:37 IST

मराठी सिनेइंडस्ट्रीचा चॉकलेट बॉय म्हणजेच अभिनेता स्वप्नील जोशी(Swapnil Joshi)ने गुजराती सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले आहे. तो शुभचिंतक या गुजराती सिनेमात दिसणार आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीचा चॉकलेट बॉय म्हणजेच अभिनेता स्वप्नील जोशी(Swapnil Joshi)ने गुजराती सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले आहे. तो शुभचिंतक या गुजराती सिनेमात दिसणार आहे. या चित्रपटात स्वप्नील सोबत राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री मानसी पारेख देखील मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचं कळतंय. या रोमांचक आणि कमाल प्रकल्पाची निर्मिती पार्थिव गोहिल आणि मानसी पारेख त्यांच्या सोल सूत्र या बॅनरखाली करत असून गोलकेरी, कच्छ एक्स्प्रेस आणि झामकुडी या गाजलेल्या हिट चित्रपटांनंतर त्यांची ही चौथी निर्मिती असणार आहे. निसर्ग वैद्य दिग्दर्शित चित्रपट एक डार्क कॉमेडी थ्रिलर असल्याचे सांगितले जातंय. 

या पहिल्या वहिल्या गुजराती चित्रपटाबद्दलची उत्सुकता व्यक्त करताना स्वप्नील जोशी म्हणाला, "गुजराती चित्रपट उद्योग वेगाने विकसित होत आहे आणि वैविध्यपूर्ण विषयांची निर्मिती करत आहे जी दूरवरच्या प्रेक्षकांना ऐकू येते आहे. सिनेमाची जादू सार्वत्रिक असावी यावर माझा नेहमीच विश्वास आहे. एक कलाकार म्हणून ही संधी माझ्यासाठी नक्कीच खास आहे आणि गुजराती चित्रपट विश्वात काहीतरी वेगळे निमित्ताने करायला मिळतेय याचा आनंद आहे. मी नेहमीच मानसीची एक अभिनेत्री म्हणून प्रशंसा केली आहे आणि तिच्यासोबत काम करण्याची माझी इच्छा पूर्ण होत आहे. या भूमिकेने मला नक्कीच आव्हान दिल आहे आणि ही भूमिका साकारण्यासाठी मी उस्तुक आहे" 

या आगामी चित्रपटाची मुख्य अभिनेत्री-निर्माती मानसी पारेख पुढे म्हणाली, “स्वप्नील या चित्रपटात ऑनबोर्ड  झाला आहे याचा आम्हाला सगळ्यांना आनंद झाला आहे. स्वप्नील सोबत स्क्रीन स्पेस शेअर करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. आम्ही लूक टेस्ट आणि वर्कशॉपसाठी आधीच भेटलो आहोत आमच्या सुरुवातीच्या नोट्सची देवाणघेवाण केली आणि आता कधी एकदा रोल होतोय याची वाट पाहत आहोत.

टॅग्स :स्वप्निल जोशी