Join us
Daily Top 2Weekly Top 5

"अशीच शिक्षा पाहिजे..!", सुबोध भावेची नवीन पोस्ट चर्चेत, नेमकी भानगड काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 10:11 IST

अभिनेता सुबोध भावेने लिहिलेली नवीन पोस्ट चर्चेत आहे. काय म्हणालाय सुबोध भावे वाचा क्लिक करुन

मराठमोळा अभिनेता सुबोध भावे हा सर्वांचा आवडता अभिनेता. सुबोधने आजवर विविध सिनेमांमध्ये अभिनय करुन प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं खास स्थान निर्माण केलंय. सुबोध सोशल मीडियावर त्याच्या विविध पोस्टच्या माध्यमातून चर्चेत असतो. सुबोधने एक व्हिडीओ पोस्ट करुन अशीच एक पोस्ट लिहिलीय. "अशीच शिक्षा पाहिजे..!", "गदागदा  रडत असतील.." अशी पोस्ट सुबोधने लिहिलीय. नेमकं प्रकरण काय?

सुबोधने एक व्हिडीओ शेअर केलाय. यात तो काही मुलांना शिकवताना दिसत असून शूटींग सुरु असलेलं दिसतं. हा व्हिडीओ शेअर करुन सुबोध लिहितो, "12 वी बोर्ड परीक्षेत आम्ही मोठ्या मनाने आणि मोठ्या मार्काने physics या विषयात "नापास " झालो, आणि आज एका चित्रपटात मी physics च्या प्राध्यापकाची भूमिका करताना विद्यार्थ्यांंना घडवत आहे. अशीच शिक्षा पाहिजे "physics" ला.. आमच्या मातोश्री यांना हा चित्रपट दाखवल्यावर त्या गदगदा रडतील.."

सुबोधच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. सुबोध भावेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर.. तो सध्या 'संगीत मानापमान' सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय या नव्या सिनेमाच्या शुटींगमध्ये सुबोध व्यस्त आहे. याशिवाय शुटींगमधून वेळात वेळ काढून सुबोध त्याच्या कुटुंबासोबत काश्मिरला फिरायला गेला होता. सुबोधच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे.

 

टॅग्स :सुबोध भावे मराठी