असंख्य व्यक्तींचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. (chhatrapati shivaji maharaj) शिवरायांची जयंती (shivjayanti) साजरी करण्यासाठी जगभरातील माणसं एकत्र आली आहेत. आज रायगडावर मोठा उत्सव साजरा झालाय. यावेळी विकी कौशल रायगडावर आलेला दिसला. मराठी सेलिब्रिटी आज छत्रपती शिवरायांबद्दल पोस्ट लिहित आहेत. अशातच अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने छत्रपती शिवाजी महाराजांवर खास कविता केली आहे. संकर्षणने लिहिलेली ही छोटीशी तरीही सुंदर कविता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झालीय.
संकर्षण कऱ्हाडेची कविता
संकर्षण कऱ्हाडेने सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पोस्ट करुन कविता लिहिलीये की,
शौर्य असे जे चार शतकं , जगी जिवंत राहिलेकर्तृत्वं असे कि ब्रम्हांडाने , केंव्हाच नाही पाहिलेदृष्टं काढण्या समर्थ नाही , काजळही त्या तेजाचीहिमालयासही नाही ईतकि , छाती आमच्या राजाचीपुढल्या जन्मी शंभो इतुकी , ईच्छा पूर्ण व्हावीछत्रपती शिवरायांची , प्रत्यक्षं भेट व्हावीठेऊनी मस्तक पायावरती , म्हणेन मला आशिष द्याऊपकार करा जगावर राजे , या हो या पुन्हा या … - संकर्षण गोविंद कऱ्हाडे
अशाप्रकारे संकर्षण कऱ्हाडेने छत्रपती शिवाजी महाराजांवर खास कविता लिहिलीये. संकर्षणची ही कविता वाचून अनेकांनी त्याच्या लिखाणाचं कौतुक केलंय. संकर्षणच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, तो सध्या 'संकर्षण व्हाया स्पृहा' हा कार्यक्रम अभिनेत्री स्पृहा जोशीसोबत करताना दिसतोय. याशिवाय 'तू म्हणशील तसं' या नाटकात अभिनय करतोय. संकर्षणचं सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोईंग आहे.