Join us  

सीएए कायद्याच्या अंमलबजावणीबद्दल काय म्हणाले कमल हासन? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 11:33 AM

बॉलिवूडसह दाक्षिणात् अभिनेत्यांनीदेखील सीएएवर आपलं मत मांडलं आहे.

केंद्र सरकारकडून 11 मार्च 2024 रोजी भारतीय नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) लागू झाला आहे. संसदेने मंजुरी दिल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) केंद्र सरकारने सोमवारी लागू केला. यासंदर्भातील अधिसूचना काढण्यात आली आहे.केंद्र सरकारच्या या निर्णयावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. बॉलिवूडसह दाक्षिणात् अभिनेत्यांनीदेखील सीएएवर आपलं मत मांडलं आहे. आता अभिनेते व मक्कल निधी मय्यम पक्षाचे सर्वेसर्वा कमल हासन यांनीदेखील सीएए कायद्याला विरोध दर्शवला आहे.  

कमल हासन यांनीही 'द हिंदू' ला दिलेल्या मुलाखतीत सीएए कायद्यावर भाष्य केलं. ते म्हणाले,  'माझ्या मते, सीएए हा एका समुदायावर नाही तर संविधानावर केलेला हल्ला आहे'. यापुर्वीही कमल हासन यांनी सीसीए कायद्याचा विरोध दर्शवलेला आहे. 'आगामी लोकसभा निवडणुकीत केंद्रातील मोदी सरकार सौहार्द बिघडवत असून देशात फूट पाडत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी CAA घाईघाईने लागू केल्याचं ते म्हणाले होते. 

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू झाल्याने सध्या देशभरात राजकीय वातावरण तापलेलं आहे. ३१ डिसेंबर २०१४पूर्वी  पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या गैरमुस्लीम नागरिकांना या कायद्याद्वारे भारतीय नागरिकत्व देण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी या कायद्याचे समर्थक आणि विरोधक यांच्यात मोठा वाद देखील निर्माण झालेला आहे. या कायद्याबद्दल भाजपाकडून एकीकडे जनजागृती केली जात असताना दुसरीकडे विरोधीपक्षांकडून याचा जोरादार विरोध केला जात आहे. . कमल हासन यांच्याबरोबरच थलापती विजय (Thalapathy Vijay), अनुराग कश्यप (Anurag Kashyap), स्वरा भास्कर (Swara Bhaskar), जावेद जाफरी (Jaaved Jaaferi) या सेलिब्रिटींचा समावेश आहे.

  

टॅग्स :कमल हासनसेलिब्रिटी