बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान अर्थात केआरके त्याच्या वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत असतो. सध्या अशाच एका ट्विटमुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. होय, केआरकेने एक व्हिडीओ शेअर करत, त्याच्या मुलाने कारला अपघात केल्याची माहिती शेअर केली. या अपघातात केआरकेच्या मुलाला कुठलीही दुखापत झाली नाही. पण त्याच्या बीएमडब्ल्यू कारचे मात्र बरेच नुकसान झाले.केआरकेने एक व्हिडिओ शेअर करत, त्याच्या मुलाने कारला अपघात केल्याची माहिती दिली. एकापाठोपाठ एक असे दोन ट्विट त्याने केलेत. ‘माझ्या मुलाने कारचा अपघात केला आहे’,असे त्याने पहिल्या ट्विटमध्ये सांगितले. सोबत एक व्हिडिओही शेअर केला. ‘फैजल (केआरकेचा मुलगा) ऑफिसला जात होता आणि त्याने गाडीचा अपघात केला. गाडीचा अगदी उत्तम प्रकारे त्याने अपघात केला आहे. पण ठिक आहे हरकत नाही,’असे केआरके या व्हिडिओत सांगतोय.
या वादग्रस्त अभिनेत्याच्या मुलाने केला अपघात, आता मागतोय ऑडी आर 8 किंवा रेंज रोव्हर!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 11:06 IST
या अपघातात अभिनेत्याच्या मुलाला कुठलीही दुखापत झाली नाही. पण त्याच्या बीएमडब्ल्यू कारचे मात्र बरेच नुकसान झाले.
या वादग्रस्त अभिनेत्याच्या मुलाने केला अपघात, आता मागतोय ऑडी आर 8 किंवा रेंज रोव्हर!!
ठळक मुद्देकेआरके आणि वाद यांचे खूपच जवळचे नाते आहे.