Join us  

अभिनेता गौरव घाटणेकरचं छोट्या पडद्यावर कमबॅक, दिसणार या मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 12:38 PM

Gaurav Ghatnekar : मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता गौरव घाटणेकर लवकरच नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सोनी मराठीवर भूमिकन्या - साद घालते निसर्गराजा (Bhumikanya Saad Ghalte Nisargaraja) ही नवी मालिका प्रेक्षकांना १० जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  मालिकेचा विषय फार नवीन आणि वेगळा आहे. आपल्या शेतकरी वडिलांना ही भूमिकन्या कशी साथ देणार, हे या मालिकेतून पाहायला मिळणार आहे. ‘भूमिकन्या - साद घालते निसर्गराजा’ मालिकेची झलक प्रेक्षकांना विशेष आवडली आणि त्यामुळे या मालिकेची सर्वत्र चर्चा पाहायला मिळते आहे.  मालिकेचे प्रमुख आकर्षण म्हणजे या मालिकेतून गौरव घाटणेकर (Gaurav Ghatnekar)  प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 

अभिनेता गौरव घाटणेकर या मालिकेत प्रमुख भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. हर्षवर्धन असे त्याच्या व्यक्तिरेखेचे नाव असून  गौरव या मालिकेत चक्क दुहेरी भूमिका साकारणार आहे. ती म्हणजे तो या मालिकेचा निर्मातासुद्धा आहे. श्रुती मराठे आणि गौरव घाटणेकर यांच्या ब्लॅक कॉफी प्रॉडक्शन्स या निर्मिती संस्थेमार्फत या मालिकेची निर्मिती केली जात असून १० जूनपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

आपल्या शेतकरी वडिलांना ही भूमिकन्या कशी साथ देणार, हे या मालिकेतून पाहायला मिळणार आहे. लक्ष्मी असे या भूमिकन्येचे नाव असून अभिनेत्री अनुष्का बोऱ्हाडे ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. अभिनेत्री अनुष्का बोऱ्हाडे हिला प्रेक्षकांनी आजवर विविध व्यक्तिरेखांमधून पाहिले आहे. प्रेक्षकांनी तिच्यावर भरभरून प्रेमदेखील केलं आहे. पण आता ‘भूमिकन्या - साद घालते निसर्गराजा’ या मालिकेत भूमिकन्या म्हणजेच लक्ष्मी या व्यक्तिरेखेद्वारे ती प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 

टॅग्स :गौरव घाटणेकरश्रुती मराठे