Join us
Daily Top 2Weekly Top 5

'ठिपक्यांची रांगोळी' फेम अभिनेत्याने गर्लफ्रेंडसोबत केलं गुपचुप लग्न, बायकोही प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 14:36 IST

मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय कलाकार जोडीने एकमेकांशी लग्नगाठ बांधलीय. त्यामुळे सर्वांनी त्यांचं अभिनंदन केलंय.

'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतील शशांक म्हणजेच अभिनेता चेतन वडनेरेने गर्लफ्रेंडसोबत गुपचुप लग्न केलंय. चेतनने लग्नाचे फोटो त्याच्या सोशल मीडियावर शेअर केलेत. चेतनची बायको सुद्धा प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचं नाव ऋजूता धारप. चेतन - ऋजूताने त्यांच्या लग्नाचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर शेअर केलेत. 'कुर्यात सदा मंगलम्' असं कॅप्शन देत चेतन - ऋजूताने लग्नाचे फोटो शेअर केलेत. 

चेतन - ऋजूता यांनी जवळचे मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली आहे. दोघांच्या पारंपरिक अंदाजाने सर्वांचं लक्ष वेधलंय. चेतन - ऋजूता हे गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते. अखेर दोघांनी आज २२ एप्रिल २०२४ रोजी एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली. चेतन - ऋजूताच्या लग्नाचे फोटो व्हायरल होताच चाहत्यांनी दोघाचं कमेंटमध्ये भरभरुन अभिनंदन केलंय. 

चेतन - ऋजूता या दोघांनी 'फुलपाखरु' मालिकेत अभिनय केला होता. 'फुलपाखरु' मालिकेच्या सेटवरच दोघांची मैत्री झाली. आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं अशी चर्चा आहे. चेतन - ऋजूता यांनी काही वर्षांपुर्वी त्यांच्या नात्याचा जाहीर खुलासा केला. या दोघांची जोडी सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. काही महिन्यांपुर्वी साखरपुडा करुन दोघांनी आज एकमेकांसोबत सात फेरे घेत लग्नगाठ बांधली.

टॅग्स :लग्नमराठी