Join us  

अभिनेता आणि कोरिओग्राफर पुनीत पाठक अडकला लग्नबेडीत, फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 2:57 PM

पुनीत पाठक नुकताच लग्नबेडीत अडकला आहे.

खतरों के खिलाडी ९चा विजेता पुनीत पाठक नुकताच लग्नबेडीत अडकला आहे. पुनीतने त्याची फियॉन्से निधी मूनी सिंगसोबत सात फेरे घेतले आहेत. पुनीत पाठक आणि त्याच्या पत्नीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये पुनीत पाठक लग्नाच्या विधी करताना दिसतो आहे.

लग्नात पुनीत पाठकची पत्नी निधीने पिंक रंगाचा लेहंगा परिधान केला होता. त्यावर गोल्ड ज्वेलरी घातली आहे. लग्नाच्या गेटअपमध्ये निधी राजकुमारीसारखी दिसते आहे. तर पुनीत पाठकने पिंक रंगाची शेरवानी घातली आहे. डोक्यावर फेटा बांधलेला पुनित पाठक हॅण्डसम दिसतो आहे.

पुनीतने सोशल मीडियावर त्याच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत.

काही कालावधीतच त्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याचे चाहते त्याच्या फोटो व व्हिडीओला लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

यापूर्वी पुनीतने सोशल मीडियावर लग्नाच्या तारखेबद्दल सांगितले होते.‘आता ही तारीख नेहमीसाठी आमच्यासोबत असेन. या तारखेला खूप काही बदलणार आहे. ११ डिसेंबर २०२० रोजी आमच्या आयुष्याचा नवा चॅप्टर सुरु होईल. हा माझ्या व तुझ्या आयुष्याचा सर्वात सुंदर चॅप्टर असेन,’ असे लग्नाची तारीख शेअर करताना त्याने लिहिले आहे. गेल्या २६ ऑगस्टला पुनीत व निधीचा साखरपुडा झाला होता. या साखरपुड्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

पुनीत फिल्म इंडस्ट्रीतील मोठा कोरिओग्राफर आहे. अभिनेता अशीही त्याची ओळख आहे. पुनीत ‘खतरों के खिलाडी ९’चा विनर होता. एबीसीडी, नवाबजादे अशा सिनेमात त्याने काम केले आहे. ‘स्ट्रिट डान्सर थ्रीडी’ या सिनेमातही तो झळकला.

टॅग्स :पुनित पाठक