Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘फर्जी’मध्ये दिसणार कृती आणि शाहिद

By admin | Updated: September 15, 2014 04:54 IST

हीरोपंती’ हिट झाल्याचा फायदा टायगर श्रॉफबरोबरच कृती सेनन हिलादेखील होत आहे. कृतीचा एक दक्षिण भारतीय चित्रपट हिंदीतही रिलीज करण्यात आला

‘हीरोपंती’ हिट झाल्याचा फायदा टायगर श्रॉफबरोबरच कृती सेनन हिलादेखील होत आहे. कृतीचा एक दक्षिण भारतीय चित्रपट हिंदीतही रिलीज करण्यात आला आहे. एका चित्रपटात तिला अक्षयकुमारची हिरोईन बनण्याची संधी मिळाली असताना आता ती ‘फर्जी’ नावाच्या चित्रपटात शाहिद कपूरसोबत दिसणार आहे. राज निदिमो आणि कृष्णा डीके हे ‘फर्जी’चे निर्माते आहेत. या चित्रपटात शाहिद हा तंत्रज्ञानाचा गैरवापर करणारा गुन्हेगार आहे. शाहिदसोबत काम करण्याची संधी मिळत असल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजते, असे कृतीने सांगितले. दुसरीकडे सलग फ्लॉप चित्रपट देऊनही शाहिदकडे चित्रपटांची रांग लागली आहे.