Join us

अभिषेक बच्चनला ही व्यक्ती देते अभिनयाचे सल्ले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 08:00 IST

अभिषेक बच्चन अनुराग कश्यपच्या 'मनमर्जियां' सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत विकी कौशल व तापसी पन्नूदेखील मुख्य भूमिकेत आहेत.

ठळक मुद्देऐश्वर्या देते अभिषेकला अभिनयाचे सल्लेअडचणीत अभिषेकला अनुपम खेर देतात प्रेरणा

सध्या बॉलिवूडमध्ये बरेच सेलेब्स लग्नबेडीत अडकले आहेत. मात्र नवीन जोडींमध्ये जुने कपल नेहमीच चर्चेत असतात. असेच चर्चेत असणारी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी म्हणजे ऐश्वर्या राय बच्चनअभिषेक बच्चन. या दोघांची प्रेमकथा इतर लवस्टोरीपेक्षा वेगळी आहे. या दोघांमधील प्रेम २००७मध्ये लग्न केल्यानंतर वाढले. त्यांना एक मुलगी आहे. जिचे नाव आहे आराध्या. ऐश्वर्या आणि अभिषेक आपल्या खासगी व प्रोफेशनल जीवनात एकमेकांना नेहमीच साथ देताना दिसतात. अभिषेकचा आगामी सिनेमा 'मनमर्जियां'च्या प्रमोशनवेळी त्याने ऐश्वर्या मला प्रत्येक गोष्टीत पाठींबा देते व त्याशिवाय ती मला अभिनयाचे सर्वोत्तम सल्ले देते. जे मला कामी येतात. 

अभिषेक बच्चनने सांगितले की, जेव्हा माझा पहिला चित्रपट 'ढाई अक्षर प्रेम के' चित्रपटाचे चित्रीकरण करत होतो तेव्हा ऐश्वर्याने मला माझे दात व नाक चेक करायला सांगितले होते. त्यावेळी ऐश्वर्याने प्रॅक्टिकल टीप दिली होती. तसेच मला अभिनेते अनुपम खेर यांच्याकडून देखील खूप शिकायला मिळाले आहे. जेव्हा मी अडचणीत असतो तेव्हा मला अनुपम खेर प्रेरणा देतात. 

अभिषेक बच्चनने बॉलिवूडमध्ये खूप कमी सिनेमात काम केले आहे. मात्र चित्रपट त्याचेच नावाने आठवतात. धूम चित्रपटाची फ्रेंचाइझी त्याच्याशिवाय अपूर्ण आहेत. पा आणि गुरू यांसारखे चित्रपटातील त्याचे काम कौतुकास्पद होते. आता तो अनुराग कश्यपच्या 'मनमर्जियां' सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत विकी कौशल व तापसी पन्नूदेखील मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना खूप भावला असून हा सिनेमा १४ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :अभिषेक बच्चनऐश्वर्या राय बच्चनअनुपम खेर