Join us

अभिजित बनला सिझोफ्रेनिक

By admin | Updated: August 13, 2016 04:38 IST

अभिजित खांडकेकर लवकरच ‘भय’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात मुंबईत राहणाऱ्या सामान्य लोकांच्या मनात कोणकोणत्या गोष्टींची भीती असू शकते, हे पाहायला मिळेल.

अभिजित खांडकेकर लवकरच ‘भय’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात मुंबईत राहणाऱ्या सामान्य लोकांच्या मनात कोणकोणत्या गोष्टींची भीती असू शकते, हे पाहायला मिळेल. अभिजित या चित्रपटात सिझोफ्रेनिया या आजाराने ग्रस्त असलेल्या एका व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाविषयी अभिजित सांगतो, ‘‘मी याआधी एका नाटकात अशा प्रकारची भूमिका साकारली होती. त्यामुळे सिझोफ्रेनिया या आजाराने ग्रस्त असलेल्या माणसाची भूमिका साकारणे माझ्यासाठी कठीण नव्हते. त्यातच माझी पत्नी सुखदा ही क्लिनिकल सायकोलॉजिस्ट असल्याने ही भूमिका साकारण्यासाठी तिने मला खूप मदत केली. तसेच, या चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल भाटणकर यांनीदेखील मला वेळोवेळी मार्गदर्शन केले. या दोघांमुळे मला ही भूमिका चांगल्या प्रकारे सादर करता आली, असे मला वाटते. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाचे सगळे चित्रीकरण मुंबईत झाले असले, तरी त्यातील एका गाण्याचे चित्रीकरण दुबईत झाले आहे. दुबईतील अनेक प्रसिद्ध ठिकाणी आम्ही या गाण्याचे चित्रीकरण केले आहे.