Join us  

अभिजीतने केली संकर्षण कऱ्हाडेची भित्र्या सशासोबत तुलना; म्हणाला, 'तो म्हणजे...'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 2:12 PM

Abhijeet khandkekar: अभिजीतने संकर्षणविषयी केलेल्या वक्तव्याची सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

कलाविश्वात असे अनेक कलाकार आहेत जे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. त्यामुळे या कलाकारांची मैत्री, त्यांच्यातील बॉण्डिंग कायम पाहायला मिळतं.  अलिकडेच अभिनेता अभिजीत खांडकेकर (Abhijeet khandkekar)  याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने संकर्षण कऱ्हाडेसोबतच्या मैत्रीवर भाष्य केलं. सोबतच काही जुन्या आठवणींनाही उजाळा दिला.

अभिजीतने कोणताही गॉड फादर नसतांनाही इंडस्ट्रीत त्याचं हक्काचं स्थान निर्माण केलं. अलिकडेच त्याने भार्गवी चिरमुलेच्या ‘गप्पा मस्ती आणि पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुले’ या पॉडकास्टला मुलाखत दिली.  या मुलाखतीमध्ये त्याने स्ट्रगल काळातील आठवणींना उजाळा दिला.महाराष्ट्राचा सुपरस्टार या स्पर्धेचा अनुभव उत्तम होता. सचिन मोटे आणि सचिन गोस्वानी आमचं स्कीट बसवायचे. महेश मांजरेकर, सुप्रिया पिळगांवकर हे परिक्षक होते. याचवेळेला माझं मासकॉम संपत आलेलं मी रेडिओमध्ये जॉब करत होतो. तिथून त्यांनी मला काढलं होतं. दोन महिन्यांचा पगार दिला नव्हता. आज अर्थात तिथेच मुलाखतीसाठी बोलावतात. त्याकाळात खूप धावपळ झाली. स्पर्धेमध्ये मला लक्षात आलं की आपल्या मर्यादा काय आहेत. मी शिकलेला अभिनेता नाही आहे. त्यामुळे प्रोफेशनली काम करण्याचा अनुभव अजिबात नव्हता. जो अनुभव आमच्यातल्या काही जणांना सगळ्यात उत्तम होता. या स्पर्धेतला सगळ्यात अवघड प्रकार म्हणजे विनोद. निलेश साबळे, तेजपाल वाघ, निखिल राऊत यातल्या अनेकांनी आधीपासून खूप मोठी मोठी काम केली असल्यामुळे प्रत्येकाकडून शिकण्यासारख होतं,” असं अभिजीत म्हणाला.

पुढे तो म्हणतो, त्यावेळी संकर्षण कऱ्हाडे म्हणजे अगदीच भित्रा ससा होता. म्हणजे आज तो जो काही झालाय ते पाहून मला त्याचा खूप अभिमान वाटतो. आभाळ कोसळेलं की काय? अशा घाबरणाऱ्या भित्र्या सशाची गोष्ट तो अक्षरशः तसा होता. तो कदाचित त्याच्या अभिनयाचा भाग ही असू शकतो. पण, इतका बदल त्या शोमुळे आमच्यात झाला.”

दरम्यान, माझी या प्रियाला प्रीत कळेना या मालिकेच्या माध्यमातून अभिजीत नावारुपाला आला. या मालिकेनंतर तो अनेक मालिकांमध्ये झळकला. सध्या तुझेच मी गीत गात आहे, या मालिकेत तो मुख्य भूमिका साकारत आहे. तर, संकर्षणच्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकाचे प्रयोग सुरू आहेत.

टॅग्स :अभिजीत खांडकेकरसेलिब्रिटीटिव्ही कलाकारमराठी अभिनेताभार्गवी चिरमुले