Join us
Daily Top 2Weekly Top 5

Abhidnya Bhave : प्रेग्नेंसीच्या चर्चांवर अभिज्ञा भावेनं सोडलं मौन, म्हणाली - 'हो आणि...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 13:04 IST

Abhidnya Bhave : अभिज्ञा भावेच्या लेटेस्ट फोटोंवरुन ती प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. नुकतेच अभिज्ञाच्या नवऱ्याचा म्हणजेच मेहुल पै याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तेव्हा अभिज्ञाने त्याच्यासाठी खास सरप्राईज पार्टी अरेंज केली होती. अभिनेत्री रेश्मा शिंदे सह काही जवळचे मित्र मंडळी मेहुलच्या वाढदिवसाला हजर होते. मेहुलच्या वाढदिवसाचे काही खास क्षण अभिज्ञाने सोशल मीडियावर शेअर केलेले पाहायला मिळाले. मेहुलला चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा देणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. या फोटोवरुन तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले. ती प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान आता तिने यावर मौन सोडले आहे.

एका फोटोवरून युजरने अभिज्ञाला तू प्रेग्नंट आहेस का? असा प्रश्न विचारला. त्यावर अभिज्ञाने प्रतिक्रिया देण्याचे टाळलेले पाहायला मिळाले. मात्र एका युजरने तर ‘पोट खूप सुटलंय, नाही जमले’ अशी थेट टिकाच केलेली पाहायला मिळाली.

या टीकेला मात्र अभिज्ञाने सडेतोड उत्तर देताना म्हटले आहे की, ‘हो आणि त्याबरोबर माझं करिअर पण सुटलंय! पण तुमचं तर फक्त पोटच सुटलेलं दिसतंय, माझ्या करिअरकडून प्रेरणा घेतलीत तर तुमच्या पोटाकडे लोकांचे लक्ष जाणार नाही.’ अभिज्ञाच्या या सडेतोड उत्तरावर आता तिच्यामध्ये तिने साकारलेल्या वल्लीचं कॅरॅक्टर रक्तात शिरलंय अशी मजेशीर प्रतिक्रिया चाहत्याने व्यक्त केली आहे.

टॅग्स :अभिज्ञा भावे