Join us  

कोरिओग्राफर पुनित पाठक अडकणार लग्नबंधनात,साखरपुड्याचे फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 4:38 PM

पुनितने आपल्या करिअरची सुरुवात डान्स इंडिया डान्सच्या स्टेजपासून केली होती.डान्सच्या क्षेत्रात एंट्री केल्यानंतर पुनीत पाठकने  डान्स प्लसच्या बर्‍याच सीझनचा मध्ये तो झळकला.

नुकतंच कोरिओग्राफर पुनीत पाठकचा गर्लफ्रेंड निधी मोनी सिंहशी कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत साखरपुडा पार पडला आहे. खुद्द पुनीतनेतच आनंदाची गोष्ट फोटो शेअर करत सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केली आहे. फोटो बघताच टेरेंस लेविसपासून गौहर खान, सुगंधा मिश्रा, रेमो डीसूजा यांनी शुभेच्छा दिल्या. सेलिब्रेटींसह चाहत्यांचाही  शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला आहे. दोघेही ट्रेडिशनल लूकमध्ये पाहायला मिळत असून निधीने पिवळ्या रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. यात ती खूपच सुंदर दिसत आहे. चेह-यावर तिचा आनंद झळकत असल्याचे पाहायला मिळते आहे. तर पुनितने  फ्लोरल डिझाइन असलेली शेरवानी परिधान केली आहे. 

तुर्तास साखरपुडा झाला असला तरी लग्नाची तारिख अजुन समोर आलेली नाही. दोघेही अनेक वर्षापासून एकमेकांना डेट करत होते. आपल्या जीवनातील या खास क्षणाला संस्मरणीय करायचे दोघांनी ठरवले आहे. त्यानुसार सध्या दोन्ही कुटुंबामध्ये लग्नाविषयी खास प्लॅनिंग केले जात आहे. दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. हेच प्रेम ते या ना त्या पद्धतीने व्यक्त करत असतात. नुकतेच पुनितने निधीचा एक फोटो शेअर केला होता तेव्हाच त्यांच्या प्रेमाची प्रचिती आली होती. साखरपुडा झाला असला तरी सनई चौघडे कधी वाजणार अर्थात त्यांच्या लग्नाची तारीख काय हे अद्याप समोर आलेले नाही. 

पुनितने आपल्या करिअरची सुरुवात डान्स इंडिया डान्सच्या स्टेजपासून केली होती.डान्सच्या क्षेत्रात एंट्री केल्यानंतर पुनीत पाठकने  डान्स प्लसच्या बर्‍याच सीझनचा मध्ये तो झळकला.इतकेच नाही तर 'खतरों के खिलाडी'च्या 9 व्या सिझनचे विजेतेपदही त्याने जिंकले. त्याचबरोबर 'झलक दिखला जा' आणि 'खतरा खतरा खतरा' सारख्या रिअॅलिटी शोमध्ये तो सहभागी झाला होता.. याशिवाय 'एबीसीडी' सिनेमाच्या माध्यमातून पुनीतनेही बॉलिवूडमध्येही पदार्पण केले आहे. 

टॅग्स :पुनित पाठक