Join us
Daily Top 2Weekly Top 5

आराध्याच्या वाढदिवसाचे प्लानिंग

By admin | Updated: November 4, 2014 01:51 IST

ऐश्वर्या रॉय बच्चनने नुकतेच तिचा ४१ वा वाढदिवस साजरा केला आहे, आता ती तिच्या मुलीच्या म्हणजेच आराध्याच्या वाढदिवसाच्या तयारीला लागली आहे

ऐश्वर्या रॉय बच्चनने नुकतेच तिचा ४१ वा वाढदिवस साजरा केला आहे, आता ती तिच्या मुलीच्या म्हणजेच आराध्याच्या वाढदिवसाच्या तयारीला लागली आहे. आराध्याचा वाढदिवस येत्या १६ नोव्हेंबरला आहे. ऐश म्हणते, ‘हो, वाढदिवसाला काहीच दिवस बाकी आहेत आणि मी त्यासाठी एक योजना आखली आहे.’ आराध्या १६ नोव्हेंबरला तीन वर्षांची होत आहे. ऐश्वर्या सांगते, ‘जेव्हा ती एक वर्षाची झाली तेव्हा काही जवळचे मित्र आणि कौटुंबिक सदस्यांना आमंत्रित केले होते. मागील वर्षी आम्ही मोठे सेलिब्रेशन केले आणि लहान मुलांना वाढदिवसासाठी आमंत्रित केले होते. यावेळी दोन्हींच्या मिश्रणाचा विचार करतेय.’ जेव्हा ऐशला विचारण्यात आले की, आराध्याला तिच्या आईच्या वाढदिवसाबाबत माहीत आहे का, तेव्हा तिने उत्तर दिले की, ‘ती आता समजू लागली आहे की, आईचाही वाढदिवस आहे. एवढेच नव्हे तिला तर हे ही माहीत आहे की, तिचाही वाढदिवस येणार आहे.