आमिर खानचा ‘पीके’ हा चित्रपट ािसमसला रिलीज होत आहे, या चित्रपटासाठी अजून बराच वेळ बाकी आहे; पण चित्रपटाच्या प्रचारासाठी आमिर तब्बल दीड महिना प्रयत्न करणार आहे. आमिर नुकताच जपान येथे पत्नी किरण आणि मुलगा आजादसोबत सुटी घालवून परतला आहे. आमिर टोकियो फिल्म फेस्टिव्हलमध्ये भाग घेण्यासाठी जपानला गेला होता; पण किरणचा वाढदिवस असल्याने तो तेथेच थांबला. आता या पुढील 43 दिवस तो फक्त ‘पीके’ या चित्रपटाला देणार आहे. आमिर दिवसभर चित्रपटाचा दिग्दर्शक राजकुमार हिराणीसोबत असतो. चित्रपटाच्या प्रचाराची रणनीती या दोघांनी आखली आहे. त्यामुळे आगामी काही दिवस तरी तो चित्रपटासाठी देणार आहे. सध्या इतर कोणत्याही कामात लक्ष न घालण्याचे त्याने ठरवले आहे.