Join us

‘पीके’च्या सिक्वलसाठी आमिर तयार

By admin | Updated: December 24, 2014 23:31 IST

अभिनेता आमिर खानचा ‘पीके’ हा चित्रपट या शुक्रवारी रिलीज झाला.

अभिनेता आमिर खानचा ‘पीके’ हा चित्रपट या शुक्रवारी रिलीज झाला. या चित्रपटाला मिळालेल्या चांगल्या प्रतिक्रिया पाहता आमिर आता या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये काम करायलाही तयार आहे. अद्याप सिक्वलबाबत काहीही घोषणा करण्यात आलेली नाही. राजकुमार हिराणींनी जर सिक्वल बनविण्याचा निर्णय घेतला, तर त्यात मी नक्क ीच काम करीन असे आमिर म्हणाला. १९ डिसेंबरला रिलीज झालेल्या ‘पीके’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई केली असून १०० कोटी क्लबमध्ये प्रवेशही मिळवला आहे.