आमिर खान ‘पीके’ या लवकरच रिलीज होणा:या चित्रपटात नऊ वेगवेगळ्या अवतारांमध्ये दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी आमिरला दररोज विडय़ाची पाने खावी लागत असत. आमिरनुसार या भूमिकेसाठी त्याला एका दिवसात शंभर पानेही खावी लागली आहेत. आमिर म्हणाला की, ‘मला पान खाण्याची सवय नाही. मी कधी कधी पान खात असतो; पण चित्रपटासाठी मला प्रत्येक सीनसाठी पान खावे लागले आहेत. आमच्या सेटवर एका पानवाल्याची सोय करण्यात आली होती.’ राजकुमार हिराणींचे दिग्दर्शन असलेल्या पीके या चित्रपटात आमिरसह अनुष्का शर्मा, संजय दत्त आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या 19 डिसेंबरला रिलीज होत आहे.