Join us  

बदललेल्या वेळेचा TRP वर परिणाम! या मालिकेने मारली बाजी तर या मालिकेची प्रेक्षकसंख्या घटली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2024 5:04 PM

या आठवड्यातील मालिकांचं TRP रेटिंंग समोर आलं असून कोणत्या मालिकेने TRP मध्ये बाजी मारली हे जाणून घेण्यासाठी बातमी वाचा

TRP ही अशी गोष्ट आहे जी कोणती मालिका अव्वल आणि कोणती मालिका फ्लॉप हे ठरवत असते. TRP च्या छोट्याश्या आकड्यांवर मालिकेचं भवितव्य ठरत असतं. कोणती मालिका चांगली, कोणत्या मालिकेची प्रेक्षकसंख्या घटली हे सर्व TRP मुळे कळत असतं. अशातच या आठवड्याचा TRP चा आकडा समोर आलाय. पाहा कोणत्या मालिकेने बाजी मारली आणि कोणती मालिका फ्लॉप ठरली. 

TRP च्या लेटेस्ट अपडेटनुसार 'ठरलं तर मग' मालिकेने TRP मध्ये पुन्हा एकदा बाजी मारली आहे. तर 'आई कुठे काय करते' मालिकेची  वेळ बदलल्याने  मालिकेच्या TRP वर मोठा परिणाम झालेला दिसतोय. 'आई कुठे काय करते' मालिकेची चौथ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. याशिवाय दुसऱ्या -  तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे 'प्रेमाची गोष्ट' आणि 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकांना स्थान मिळालंय.

'तुला शिकवीन चांगलाच धडा' आणि 'नवरी मिळे हिटलरला' या झी मराठीवरील  दोन मालिकांचा टॉप 10 मध्ये सहभाग आहे. अशाप्रकारे टॉप 10 मधील तब्बल ८ मालिका या स्टार प्रवाहच्या आहेत. त्यामुळे स्टार प्रवाहच्या नवीन - जुन्या सर्वच मालिकांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळतेय. आता पुढच्या आठवड्यात या आकड्यांमध्ये कसा बदल होऊन कोणती मालिका वरचढ ठरणार हे पाहायचं आहे.

 

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकाजुई गडकरीटीआरपी