Join us

'आई कुठे काय करते'मधील अरुंधतीचा ग्लॅमरस लूक, फोटो होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 17:26 IST

Madhurani Prabhulkar : अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रभुलकरचा ग्लॅमरस लूक चर्चेत आला आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. या मालिकेच्या कथानक आणि पात्राला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळते आहे. या मालिकेतील आई म्हणजेच अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिने निभावली आहे. मधुराणी प्रभुलकर सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकतेच अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रभुलकरचा ग्लॅमरस लूक चर्चेत आला आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

मधुराणी प्रभुलकर हिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे. या फोटोत तिने लाल रंगाचा वन पीस परिधान केला आहे. तिच्या या फोटोला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. याआधीदेखील तिने वेस्टर्न आउटफिटमधील फोटो शेअर केले होते. या फोटोंनादेखील पसंती मिळताना दिसते आहे. तिचे हे फोटो पाहून तिच्या चाहत्यांना तिचा हा लूक मालिकेत पाहायला मिळणार की काय असे वाटत आहे.

सध्या आई कुठे काय करते ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. मालिकेत एकीकडे ईशा आणि अनिशच्या साखरपुड्याची तयारी सुरू आहे. तसेच अरुंधती आणि आशुतोष मधील प्रेम हळूहळू फुलताना दिसत आहे. यांच्यासोबतच अनघा आणि अभिमधील दुरावादेखील हळूहळू कमी होतो आहे. मात्र दुसरीकडे अनिरुद्ध आणि संजना यांच्यामधील वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अनिरुद्धचा संशयी स्वभाव वाढत आहे. त्यामुळे त्या दोघांमध्ये वारंवार वाद होत आहेत. ईशा आणि अनिश यांचा साखरपुडा कोणत्याही विघ्नाशिवाय पार पडेल का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

टॅग्स :मधुराणी प्रभुलकरआई कुठे काय करते मालिका