Join us  

"अखेर देवाने दर्शनासाठी बोलावलं..", जेजुरी गडावर पोहोचली 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 10:46 AM

अश्विनी महांगडे हे टीव्ही जगतातील लोकप्रिय नाव आहे.

अभिनेत्री अश्विनी महांगडे ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. सध्या अश्विनी आई कुठे काय करते मालिकेत अनघाची भूमिका साकारताना दिसते आहे. तिला या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळताना दिसते आहे.  अश्विनी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. आगामी प्रोजेक्टची माहिती ती पोस्टद्वारे चाहत्यांना देत असते. अश्विनी अनेक समाजपयोगी कार्यक्रमातही सहभाग घेताना दिसते. 

सध्या अश्विनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अभिनेत्री  थेट जेजुरी गडावर पोहोचली दिसते. जेजुरी गडावर जाऊन दर्शन घेतानाचे एक व्हिडीओ तिने शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने लिहिले, ''यळकोट यळकोट जय मल्हार....सदानंदाचा येळकोट अखेर देवाने गडावर दर्शनासाठी बोलावलं.. इतक्या वेळा जेजुरीहून कुठेतरी कार्यक्रमानिमित्त जाणे झाले, गेल्या वर्षी 'मन मंदिरा गजर भक्तीचा'चे वारीचे शूट जेजुरीच्या रस्त्यावर केले पण गडावर दर्शनासाठी जाणे झालेच नाही. मी जेव्हा तिथून जायचे आणि गड पाहायचे तेव्हा हेच मनात यायचे की देवाने अजून बोलावणे केलेच नाही. कधी योग येणार? कधी दर्शन होणार? आणि देवांनी सांगावा धाडला.. दर्शन झाल्यावर जो आनंद झाला आणि तिथे जे जाणवले ते मांडता येणे कठीण.''

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतून अश्विनी घराघरात पोहोचली. या मालिकेतील राणू अक्काची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. सध्या अश्विनी 'आई कुठे काय करते' मालिकेत काम करत आहे. 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटांतही ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. 

 

टॅग्स :अश्विनी महांगडेआई कुठे काय करते मालिका