Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आई कुठे काय करते'मधील अंकिता उर्फ राधा सागर झळकलीय हिंदी सिनेमात, जाणून घ्या तिच्याबद्दल बरंच काही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 07:00 IST

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अंकिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री राधा सागर सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. मालिकेत नुकतेच अभि अनघाऐवजी अंकितासोबत लग्न करताना दाखवला आहे. त्यामुळे अंकितासोबत देशमुख कुटुंब पटवून घेतील का, किंवा अंकिता देशमुख कुटुंबात रुळेल का, असे प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. अंकिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री राधा सागर हिच्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अंकिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री राधा सागर सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. राधाने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. ती अभिनेत्रीशिवाय उत्तम नृत्यांगनादेखील आहे. तिने कथ्थक या नृत्यप्रकाराचे प्रशिक्षण घेतले आहे.

राधा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. त्यामुळे अनेक वेळा ती तिचे फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत असते. राधा फिटनेसला प्रचंड महत्व देते. राधाला अभिनय आणि नृत्याशिवाय स्वयंपाकाचीदेखील खूप आवड आहे.

राधा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले आहे.तसेच तिने चित्रपटातही काम केले आहे.

ती बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या मलाल चित्रपटात झळकली आहे.

राधाला सॅन जोस येथे गोल्डन गेट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 'नाती खेळ' या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार राधाला मिळाला आहे.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकास्टार प्रवाह