Join us
Daily Top 2Weekly Top 5

अरुंधती पूर्ण करणार तिचं राहिलेलं शिक्षण; कॉलेजमध्ये घेणार अॅडमिशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 13:10 IST

Aai kuthe kay karte: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अरुंधती इशासमोर तिचं राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त करते.

'आई कुठे काय करते' (aai kutthe kay karte) या मालिकेत सध्या अरुंधती तिच्या आयुष्यातील एक-एक टप्पा पार पाडत आहे. देशमुखांच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अरुंधतीमध्ये अनेक बदल झाले आहेत. यात तिचा आत्मविश्वास वाढला असून ती प्रत्येक गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्येच आता ती तिचं अपूर्ण राहिलेलं शिक्षण पूर्ण करणार आहे.

सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अरुंधती इशासमोर तिचं राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त करते. अरुंधतीचा हा निर्णय इशाला फारसा रुचलेला नाही. मात्र, त्याविषयी ती काही उघडपणे बोलत नाही. परंतु, तिच्या चेहऱ्यावरील हावभावावरुन तिची नाराजी स्पष्टपणे दिसून येते.  विशेष म्हणजे आता करिअर घडवण्यासाठी पुढे वळालेली अरुंधती तिच्या निर्णयावर ठाम असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, अनिरुद्धसोबत लग्न ठरल्यामुळे अरुंधतीचं शिक्षण अर्ध्यावर राहिलं होतं. तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं नव्हतं. त्यातच देशमुखांच्या कुटुंबात आल्यानंतर जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली ती दबून गेली. परिणामी, तिचं शिक्षण मागे पडलं. मात्र, आता सगळ्या बंधनातून मुक्त झालेली अरुंधती तिचं राहिलेलं शिक्षण पूर्ण करणार आहे.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकाटेलिव्हिजनटिव्ही कलाकार