Join us
Daily Top 2Weekly Top 5

आशुतोषने तुम्हालाच संधी का दिली? कर्तृत्वावर बोट ठेवणाऱ्याला अरुंधतीने दिलं सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 18:05 IST

Aai kuthe kay karte: अरुंधतीने दिलेल्या या उत्तरामुळे संजना आणि अनिरुद्ध यांच्याही तोंडात चपराक बसली आहे.

 'आई कुठे काय करते' या मालिकेत सध्या अरुंधती प्रसिद्धीच्या शिखरावर असल्याचं पाहायला मिळत आहे. तिचं सुखाचे चांदणे हे गाणं सुपरहिट ठरलं त्यामुळे सध्या तिच्यावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे अल्पावधीत चाहत्यांनी अरुंधतीला डोक्यावर उचलून घेतल्यामुळे तिच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आल्याचं दिसून येत आहे. मात्र, एकीकडे यश, प्रेम मिळत असतानाच दुसरीकडे तिच्याविषयी नकारात्मक चर्चादेखील होऊ लागल्या आहेत. त्यामुळेच आशुतोष आणि तिच्या नात्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर अरुंधतीने थेट उत्तर दिलं आहे.

करण्यात आलं होतं. यावेळी काही पत्रकारांनी तिच्या यशामागचं गमक, तिची मेहनत यावर प्रश्न विचारले. त्याचसोबत 'सध्याच्या घडीला नवनवीन गायक येत असताना आशुतोषने तुमचीच निवड का केली?' असा खोचक प्रश्नही तिला विचारण्यात आला. त्यावर तिने सडेतोड उत्तर दिलं.

"केवळ मैत्री म्हणून आशुतोषने मला ही संधी दिली असती तर इतक्या लोकांना माझं गाणं आवडलं नसतं. माझ्या वाट्याला जे आलं त्याला १०० टक्के न्याय द्यायचा प्रयत्न मी केला आहे", असं उत्तर अरुंधतीने दिलं. 

दरम्यान, अरुंधतीने दिलेल्या या उत्तरामुळे संजना आणि अनिरुद्ध यांच्याही तोंडात चपराक बसली आहे. त्यामुळे आता अरुंधतीच्या स्वभावाची आणखी एक बाजू प्रेक्षकांना उलगडताना दिसत आहे.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकामधुराणी प्रभुलकरटेलिव्हिजनटिव्ही कलाकार