Join us
Daily Top 2Weekly Top 5

Rakhi Sawantवर कोसळला दुःखाचा डोंगर, अभिनेत्रीचं झालं मिसकॅरेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 20:48 IST

Rakhi Sawant : बिग बॉस मराठीमधून बाहेर पडल्यानंतर राखी सावंत चर्चेत आहे. तिच्या लग्नाचा खुलासा केल्यानंतर राखीने आणखी एक धक्कादायक बातमी दिली आहे. राखीने सांगितले की ती आई होणार होती पण तिचे मिसकॅरेज झाले.

ड्रामा क्वीन राखी सावंत(Rakhi Sawant)चे वैयक्तिक आयुष्य बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. यापूर्वी राखीने तिचा प्रियकर आदिल दुर्रानीसोबत लग्नाची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते, त्यानंतर तिच्या वैवाहिक जीवनात अनेक चढ-उतार आले. त्याचवेळी, आता राखीने तिच्या प्रेग्नेंसी आणि गर्भपाताची माहिती दिली आहे, जी ऐकून सगळेच अवाक् झाले आहेत. खरेतर राखी सावंतने खुलासा केला आहे की ती गरोदर होती पण तिचा गर्भपात झाला होता. राखीचे म्हणणे आहे की, तिने मराठी बिग बॉसमध्येही याबद्दल सांगितले होते पण कोणीही तिच्यावर विश्वास ठेवला नाही.

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये राखी सावंतचा फोटो हृदय तुटलेल्या इमोजीसह आहे. या पोस्टद्वारे असे सांगण्यात आले आहे की राखी सावंतसोबत त्यांचे संभाषण झाले आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीने तिचा गर्भपात झाल्याचा खुलासा केला आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, 'हो भाऊ, मी प्रेग्नंट होते आणि मी बिग बॉस मराठी शोमध्येही याबद्दल सांगितले होते. परंतु प्रत्येकाला हा विनोद वाटला आणि कोणीही ते गांभीर्याने घेतले नाही.' पुढे राखी सावंतने सांगितले की, तिचा आता गर्भपात झाला आहे. यापूर्वी राखी सावंतने एका मुलाखतीत सांगितले होते की, ती जर आदिलसोबत राहिली नाही तर ती आपल्या मुलाला एकटेच वाढवेल. तेव्हापासून राखी सावंत प्रेग्नंट असल्याचा दावा केला जात होता.

विशेष म्हणजे राखी सावंत काही काळापूर्वी 'बिग बॉस मराठी सीझन ४' मधून बाहेर आली आहे. शोमधून बाहेर आल्यानंतरच तिला तिच्या आजारी आईच्या ढासळत्या तब्येतीबद्दल कळले. यासोबतच अभिनेत्रीला तिचा प्रियकर आदिलवरही संशय येऊ लागला होता, त्यामुळे राखीने तिचे आणि आदिलचे फोटो शेअर करून मीडियामध्ये खळबळ माजवली होती. दोघांच्या लग्नाला सात महिने झाले असून राखीने आदिलसाठी धर्मही बदलला आहे. लग्नानंतर ती फातिमा बनली आहे आणि तिने स्वतः ही गोष्ट उघड केली आहे.

टॅग्स :राखी सावंत