Join us  

National Award 2023 : अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान, 'पुष्पा'च्या 'त्या' कृतीने जिंकली सर्वांची मनं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 5:29 PM

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला. अल्लू अर्जुनला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. 

68th National Film Awards: 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचा वितरण सोहळा आज (१७ ऑक्टोबर) पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करण्यात आलं. ऑगस्ट महिन्यात राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. आज राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यंदा दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला. अल्लू अर्जुनला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. 

अल्लू अर्जुनला 'पुष्पा' चित्रपटासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी अल्लू अर्जुनने खास लूक केला होता. राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात अल्लू अर्जुनच्या एका कृतीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर जाताना अल्लू अर्जुन खाली वाकून हात लावून मंचाच्या पाया पडला. त्याच्या या कृतीने उपस्थितांची मनं जिंकली. यामुळे अल्लू अर्जुनचं कौतुक होत आहे. 

६९व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये आलिया भट्टला ‘गंगुबाई काठियावाडी’ आणि क्रिती सेनॉनला ‘मिमी’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्काराने गौरविण्याच आलं. तर आर.माधवनच्या रॉकेट्रीला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा अवॉर्ड मिळाला. पल्लवी जोशी आणि पंकज त्रिपाठी यांना सहाय्यक भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

टॅग्स :अल्लू अर्जुनराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारपुष्पा