Join us

आमिरने नाकारलेल्या सिनेमांमुळे शाहरुख झाला सुपरस्टार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 15:05 IST

आमिरने नाकारलेले सिनेमे आमिरच्या वाट्याला आले आणि शाहरुख मोठा झाला.

90चा काळ हा शाहरुख खान, आमिर खान आणि सलमान खान यांच्यात विभागला गेला होता. शाहरुख खान याने या काळात अनेक सुपरहिट सिनेमे दिले आणि तो किंग ऑफ बॉलिवूड झाला. पण शाहरुखच्या या यशात अप्रत्यक्षपणे आमिर खान याचाही हात आहे. कारण आमिरने नाकारलेले सिनेमे आमिरच्या वाट्याला आले आणि शाहरुख मोठा झाला. बघुयात आमिरने नाकरलेले आणि शाहरुखने हिट केलेले काही सिनेमे.....

डर(1993)

बाजीगरसोबतच डर  हा सिनेमा शाबरुख खानचं करीअर उंचीवर नेण्यासाठी फायदा झाला. त्यावेळी आमिर खान याने हा सिनेमा नाकारला होता. कारण त्याला करीअरच्या इतक्या सरुवातीला निगेटीव्ह भूमिका करायच्या नव्हत्या. नंतर हा सिनेमा शाहरुख खानच्या वाट्याला आला. 

दिल तो पागल हैं (1997)

दिल तो पागल है या सिनेमातील अजयची भूमिका सलमान, सैफ आणि आमिरला ऑफर झाला होता. पण नंतर तो रोल अक्षय कुमार याला मिळाला. काही चर्चा अशाही ऐकायला मिळतात की, आमिरने शाहरुखचे सिनेमे यासाठी नाकरले कारण त्याला दुसरे सिनेमे मिळाले. 

जोश(2000)

जोश हा एका हॉलिवूड सिनेमाचा रिमेक सिनेमा होता. या सिनेमात दोन गॅंगचं कथानत दाखवण्यात आलंय. यातील एका गॅंगचा प्रमुख शाहरुख असतो तर दुस-या गॅंगचा प्रमुख शरद कपूर असतो. हाच रोल आमिरला ऑफर झाला होता. पण आमिरने शाहरुखमुळे हा सिनेमा नाकारला.

मोहब्बते (2000)

मोहब्बते हा सिनेमा या वर्षातला सर्वात मोठा सिनेमा ठरला. यावर्षी आमिरचा मेला सिनेमा आला होता. हा सिनेमा आमिरला ऑफर झाला होतो. 

स्वदेस(2004)

आशुतोष गोवारीकर यांच्या लगान सिनेमामुळे आमिर खान याची एक वेगळीच इमेज तयार झाली. पण आशुतोषता पुढचा स्वदेस सिनेमा आमिरने नाकारला. नंतर हा सिनेमा शाहरुखन खानकडे आला.

टॅग्स :बॉलिवूड