Join us

36 वर्षांनी लहान अभिनेत्रीसह रोमान्स करणार रजनीकांत

By admin | Updated: May 17, 2017 20:48 IST

सुपरस्टार रजनीकांत त्याच्या आगामी चित्रपटात 36 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसणार

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 -  सुपरस्टार रजनीकांत त्याच्या आगामी चित्रपटात 36 वर्षांनी लहान अभिनेत्री हुमा कुरेशी हिच्यासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. मुंबईमध्ये 28 मेपासून या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरूवात होत आहे. मुंबई मिररने याबाबत वृत्त दिलं आहे.   
 
हुमा कुरेशी या सिनेमात रजनीकांतच्या प्रेयसीची भूमिका साकारणार आहे. स्वतः हुमा रजनीकांतसोबत काम करण्यास उत्साहित आहे. हा नवीन अनुभव असेल आणि मी त्यांच्यासोबत काम करण्यास उत्साहित आहे असं हुमा म्हणाली.  रजनीकांतचा जावई धनुष आपल्या होम प्रोडक्शनखाली या सिनेमाची निर्मीती कऱणार आहे. तर पी.ए. रंजीथ हे दिग्दर्शन कऱणार आहेत. रंजीथ हे या सिनेमासाठी एका स्ट्रॉंग अभिनेत्रीच्या शोधात होते अखेर त्यांनी हुमा कुरेशीला पसंती दिली.  
 
यापुर्वी रजनीकांत यांनी एश्वर्या रॉय, दिपीका पदुकोण, सोनाक्षी सिन्हा आणि राधिका आपटे या वयाने लहान असलेल्या अभिनेत्रींसोबत हिट सिनेमे दिले आहेत.  तर हुमा कुरेशीने गॅंग्स ऑफ वासेपूरमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीच्या प्रेयसीची भूमिका निभावली होती. 
 
रजनीकांत लवकरच 2.0 या सिनेमात अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. अक्षय कुमारचा या सिनेमात निगेटिव्ह रोल असणार आहे.