कलर्स मराठी वाहिनीवरील ‘अस्सं सासर सुरेख बाई’ या मालिकेने नुकतेच ३०० एपिसोड पूर्ण केले. संतोष जुवेकर आणि मृणाल दुसानिस हे दोन कलाकार या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहेत. या मालिकेत त्यांनी साकारलेले पात्र म्हणजेच यश आणि जुई यांच्या प्रेमकथेला प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली आहे. हे या मालिकेच्या पूर्ण केलेल्या ३०० भागांवरूनच सिद्ध होते. या मालिकेतील कलाकारांचा अभिनय, एक आगळी-वेगळी कथा यामुळे ही मालिका जास्त लोकप्रिय होत आहे. या मालिकेने ३०० एपिसोड पूर्ण केल्यानिमित्ताने मालिकेच्या संपूर्ण टीमने केक कापून हा आनंद दणक्यात साजरा केला.
‘अस्सं सासर सुरेख बाई’चे 300 एपिसोड पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2016 02:29 IST