Join us
Daily Top 2Weekly Top 5

२० वर्षांचा तरुण संगीतकार!

By admin | Updated: May 20, 2015 00:09 IST

नव्या कलाकारांना संधी देणे ही तर दिग्दर्शक केदार शिंदे यांची खासियत आहे. त्यांच्या ‘अगं बाई अरेच्चा’ चित्रपटाची गाणी आजही अनेकांच्या फोनची रिंगटोन किंवा डायल टोन आहेत.

नव्या कलाकारांना संधी देणे ही तर दिग्दर्शक केदार शिंदे यांची खासियत आहे. त्यांच्या ‘अगं बाई अरेच्चा’ चित्रपटाची गाणी आजही अनेकांच्या फोनची रिंगटोन किंवा डायल टोन आहेत. अशी सदाबहार गाणी मिळाली ती त्यांनी अजय-अतुल यांना पहिल्यांदा आपल्या चित्रपटाचे संगीतकार म्हणून दिलेल्या ‘ब्रेक’मुळे. तोच इतिहास आता पुन्हा गिरवला जात आहे, असे म्हणायला हरकत नाही. कारण तब्बल ११ वर्षांनंतर येणाऱ्या ‘अगं बाई अरेच्चा २’चेही संगीत असाच एक तरुण मनाचा आणि नव्या दमाचा संगीतकार करीत आहे. निषाद हा अवघ्या २० वर्षांचा असून, तो ए. आर. रेहमान अकादमीचा विद्यार्थी आहे. चित्रपटात एकूण पाच गाणी आहेत. सगळ्या गाण्यांना त्याचेच संगीत असून शंकर महादेवन, वैशाली सामंत, आदर्श शिंदे, ओमकार दत्त व निषादचे वडील ज्येष्ठ गीतकार, गायक मनोहर गोलाम्बरे यांनी गायले आहे. ‘अगं बाई अरेच्चा २’ हा चित्रपट २२ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.