ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20- उडता पंजाब सिनेमा हा वादामुळे सर्वांच्या चांगलाच लक्षात राहिला आहे. काही दिवसांपूर्वी वाद आणि उडता पंजाब हे समीकरणच झाल्याचं पाहायला मिळालं होतं. विशेष करून सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी आणि उडता पंजाबचे निर्माते अनुराग कश्यप यांच्यातला वाद तर चांगलाच गाजला होता. शेवटी कोर्टानं हस्तक्षेप करून उडता पंजाबचा मार्ग मोकळा करून दिला. त्यातच उडता पंजाब हा चित्रपट सोशल मीडियावर लीक झाल्याची बातमी पसरली.
मात्र या वादाची कारणं होती ती सेन्सॉर बोर्डानं उडता पंजाबमध्ये सुचवलेले 89 कट. पण प्रत्यक्षात सेन्सॉर बोर्डानं या चित्रपटात 13 कट सुचवल्याची माहिती पब्लिक डोमेनमधून समोर आली आहे. या चित्रपटातील सेन्सॉर बोर्डानं सुचवलेले कट पुढीलप्रमाणे....
उडता पंजाब चित्रपटात सुचवलेले कट
1. चित्रपटातील 'पंजाब'चा सुरुवातीला असलेला साइन बोर्ड काढण्याची सूचना.
2. चित्रपटात वापरण्यात येणारे पंजाब, जालंधर, चंदगढ, अमृतसर, तरणतारण, जशनपूर, अंबेसर, लुधियाणा, मोगा हे शब्द काढून टाकावे.
3. पहिल्या गाण्यातून चित्त तन आणि हरामी हे शब्द काढून टाकावे.
4. तसेच, दुस-या गाण्यातून टॉम दी कॉक जेवे चिट्टी चिट्टी कॉक आणि कोक दी कॉक गाण्यातील हे शब्द काढून टाकावे.
5. बेहेनचोद, बेहेनछोडो, बंड, टट्टे, गांडिया, गांडू, लवडू, हरामजादी, मादरचोद, चुसा हुआ आम, कुट्टी, मयोवे, कुडी छोडे, लुल्ली, घष्टी, असे वापरण्यात आलेले शब्द काढून टाकावेत.
6. इलेक्शन, एमपी, पार्टी, एमएलए, पंजाब, पार्लिमेंट हे शब्द चित्रपटातून वगळावेत.
7. चित्रपटाच्या तिस-या गाण्यातील सरदारसाठी वापरलेले फोटो काढण्याची सूचना.
8. चित्रपटात ड्रग्ज आणि इंजेक्शन यासंबंधी घेण्यात आलेले क्लोजअप सीन काढून टाकावे.
9. तसेच, या चित्रपटात सार्वजनिक ठिकाणी लघवी करतानाचा सीन आहे, तो काढून टाकण्याची सूचना.
10. 'जमीन बंझार ते औलाद कंजार' हे वाक्य काढावे.
11. कुत्र्याला ठेवण्यात आलेले जॅकी चॅन हे नाव काढून टाकावे.
12. चित्रपटातील ड्रग्जवरच्या गाण्यावर आधारित असलेला ऑडिओ आणि व्हिडीओ काढून टाकावा.
13. तसेच, यामधील ऑडिओ आणि व्हिडीओमधील काल्पनिक सीन काढून टाकावे.