Join us

रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 13:19 IST

Share market news : देशातील टॉप १० कंपन्यांपैकी ८ कंपन्यांचे एकत्रित मूल्यांकन २ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त घसरले आहे. विशेष म्हणजे टीसीएस, एअरटेल आणि रिलायन्स इंडस्ट्रीजना सर्वाधिक नुकसान सहन करावे लागले आहे.

Share market news : गेल्या आठवड्यात शेअर बाजारात झालेल्या मोठ्या घसरणीने देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांनाही सोडले नाही. आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी, सेन्सेक्सच्या टॉप १० कंपन्यांपैकी ८ कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये मोठी घसरण झाली. या घसरणीमुळे या कंपन्यांचे एकूण मूल्य तब्बल २.०७ लाख कोटी रुपयांनी कमी झाले. यात दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि भारती एअरटेलला सर्वात मोठा फटका बसला, तर देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची रिलायन्स कंपनीही यातून सुटली नाही.

सर्वाधिक नुकसान कोणाला?टीसीएस (TCS) : कंपनीचे बाजार भांडवल ५६,२७९ कोटी रुपयांनी घसरून ११.८१ लाख कोटी रुपयांवर आले. कंपनीच्या कमकुवत तिमाही निकालांमुळे गुंतवणूकदार आकर्षित झाले नाहीत, ज्यामुळे शुक्रवारी शेअरमध्ये सुमारे ३.५% घट झाली.भारती एअरटेल : या कंपनीचे मार्केट कॅप ५४,४८३ कोटी रुपयांनी घसरून १०.९५ लाख कोटी रुपयांवर आले.

इतर दिग्गजांनाही फटकारिलायन्स इंडस्ट्रीज : देशातील सर्वात मौल्यवान कंपनी असलेल्या रिलायन्सचे मार्केट कॅप ४४,०४८ कोटी रुपयांनी घसरून २०.२२ लाख कोटी रुपयांवर आले.इन्फोसिस : कंपनीचे मूल्यांकन १८,८१८ कोटी रुपयांनी घसरून ६.६२ लाख कोटी रुपयांवर आले.आयसीआयसीआय बँक : बँकेचे बाजार भांडवल १४,५५६ कोटी रुपयांनी घसरून १०.१४ लाख कोटी रुपयांवर आले.

एलआयसी, एचडीएफसी, एसबीआयलाही फटकाभारतीय जीवन विमा महामंडळाचे मूल्यांकन ११,९५४ कोटी रुपयांनी घसरून ५.८३ लाख कोटी रुपयांवर आले.एचडीएफसी बँकेचे बाजारमूल्य ४,३७० कोटी रुपयांनी घसरले, आणि आता ते १५.२० लाख कोटी रुपये झाले आहे.एसबीआयचे मूल्यांकन २,९८९ कोटी रुपयांनी घसरून ७.२१ लाख कोटी रुपये झाले.

या कंपन्यांनी दिलासा दिलाया घसरत्या बाजारातही काही कंपन्यांनी सकारात्मक कामगिरी करत गुंतवणूकदारांना थोडा दिलासा दिला.हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड : एचयूएलचे मार्केट कॅप ४२,३६३ कोटी रुपयांनी वाढून ५.९२ लाख कोटींवर पोहोचले. कंपनीने प्रिया नायर यांची पहिली महिला सीईओ आणि एमडी म्हणून नियुक्ती केल्यामुळे स्टॉकमध्ये सुमारे ५% वाढ झाली.बजाज फायनान्स : या कंपनीचे बाजारमूल्यही ५,०३३ कोटी रुपयांनी वाढून ५.८० लाख कोटी रुपये झाले.

वाचा - 'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स

टॉप १० कंपन्यांच्या क्रमवारीत बदल नाहीमार्केट कॅपमध्ये मोठी घसरण झाली असली तरी, टॉप १० कंपन्यांच्या यादीत मात्र कोणताही बदल झाला नाही. रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या क्रमांकावर कायम राहिली, त्यानंतर अनुक्रमे एचडीएफसी बँक, टीसीएस, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, इन्फोसिस, एलआयसी, बजाज फायनान्स आणि एचयूएल यांचा क्रमांक लागतो.

टॅग्स :शेअर बाजाररतन टाटामुकेश अंबानीटाटारिलायन्स