गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. यामुळे देशातील आघाडीच्या १० कंपन्यांपैकी सात कंपन्यांना मोठा फटका बसल आहे. या कंपन्यांचे बाजार भांडवल झटक्यात (Market Cap) ३,६३,४१२.१८ कोटी रुपयांनी घटले आहे. या घसरणीचा सर्वाधिक फटका रिलायन्स इंडस्ट्रीजला बसला आहे. संपूर्ण आठवड्यात बीएसई सेन्सेक्स २,१८५.७७ अंकांनी म्हणजेच २.५४ टक्क्यांनी घसरला आहे.
यासंदर्भात बोलताना 'एनरिच मनी'चे सीईओ पोनमुडी आर. म्हणाले, अमेरिकेकडून टॅरिफ वाढवण्याची धमकी आणि जागतिक स्तरावरील वाढता भू-राजकीय तणाव, यांमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. परिणामी गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात घसरण दिसून आली. यामुळे, टॉप टेन कंपन्यांपैकी, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, टीसीएस, भारती एअरटेल, इन्फोसिस, बजाज फायनान्स आणि एल अँड टी यांसारख्या दिग्गज कंपन्यांचे बाजार मूल्य घटले. तर, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक आणि हिंदुस्तान युनिलिव्हरच्या बाजार मूल्यात वाढ झाली आहे.
कुणाचे किती नुकसान? -- रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार मूल्य सर्वाधिक घटले, ते १,५८,५३२.९१ कोटी रुपयांनी कमी होऊन १९,९६,४४५.६९ कोटी रुपयांवर आले आहे.- एचडीएफसी बँकेचे बाजार मूल्य ९६,१५३.६१ कोटी रुपयांनी कमी होऊन १४,४४,१५०.२६ कोटी रुपयांवर आले.- भारती एअरटेलचे बाजार मूल्य ४५,२७४.७२ कोटी रुपयांनी घसरून ११,५५,९८७.८१ कोटी रुपयांवर आले.- बजाज फायनान्सचे बाजार मूल्य १८,७२९.६८ कोटी रुपयांनी कमी होऊन ५,९७,७००.७५ कोटी रुपयांवर आले.- लार्सन अँड टुब्रोचे बाजार मूल्य १८,७२८.५३ कोटी रुपयांनी घटून ५,५३,९१२.०३ कोटी रुपयांवर आले.- टीसीएसचे (TCS) बाजार मूल्य १५,२३२.१४ कोटी रुपयांनी कमी होऊन ११,६०,६८२.४८ कोटी रुपयांवर आले.- इन्फोसिसचे बाजार मूल्य १०,७६०.५९ कोटी रुपयांनी कमी होऊन ६,७०,८७५ कोटींवर आले.
या कंपन्यांना झाला फायदा -- आयसीआयसीआय बँकेचे बाजार मूल्य ३४,९०१.८१ कोटी रुपयांनी वधारले, १०,०३,६७४.९५ कोटी रुपये झाले.- हिंदुस्तान युनिलिव्हरमध्येचे बाजार मूल्य ६,०९७.१९ कोटी रुपयांची वधारले, ५,५७,७३४.२३ कोटी रुपयांवर पोहोचले.- भारतीय स्टेट बँकेचे बाजार मूल्य ५९९.९९ कोटी रुपयांनी वाढून ९,२३,०६१.७६ कोटी रुपयांवर पोहोचले.
Web Summary : Indian stock market dipped, causing a ₹3,63,412.18 Cr loss for top companies. Reliance suffered the most, with its market value decreasing by ₹1,58,532.91 Cr. Global tensions and tariff threats impacted investor sentiment negatively.
Web Summary : भारतीय शेयर बाजार में गिरावट से शीर्ष कंपनियों को ₹3,63,412.18 करोड़ का नुकसान हुआ। रिलायंस को सबसे अधिक नुकसान हुआ, जिसका बाजार मूल्य ₹1,58,532.91 करोड़ घट गया। वैश्विक तनाव और टैरिफ धमकियों का निवेशकों की भावनाओं पर नकारात्मक प्रभाव पड़ा।