tcs suffered the biggest loss : दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांची सर्वात फेव्हरेट कंपनी टीसीएसला मोठा आर्थिक फटका बसला आहे. यामुळे देशातील सर्वात मोठी दुसऱ्या कंपनीचा मानही गेला आहे. टीसीएस टाटा समूहातील सर्वात जास्त नफा कमावणारी कंपनी आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीतून टीसीएसही सुटली नाही. कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण झाल्याने मूल्यांकनात घट झाली आहे. टीसीएसला मागे टाकून एचडीएफसी बँक दुसऱ्या स्थानावर आली आहे. विशेष बाब म्हणजे चालू वर्षात म्हणजेच २ महिन्यांत TCS च्या शेअर्समध्ये १५ टक्क्यांची घसरण झाली आहे. आता ६ महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये २३ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. त्यामुळे कंपनीच्या मार्केट कॅपलाही मोठा फटका बसला आहे.
गेल्या आठवड्यात टीसीएसला मोठा तोटागेल्या आठवड्यातही टीसीएसला सर्वात मोठा तोटा सहन करावा लागला होता. कंपनीच्या शेअर्समध्ये ६.६८ टक्क्यांची घसरण दिसून आली. त्यामुळे कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये मोठी घसरण झाली आहे. NSE च्या आकडेवारीनुसार, कंपनीचे शेअर्स एका आठवड्यात २४९.१० रुपयांनी घसरले आहेत. तर शुक्रवारी कंपनीच्या शेअर्समध्ये १३४.५५ रुपयांची म्हणजे ३.७२ टक्के घट झाली. सध्या कंपनीची शेअरची किंमत ३,४७८ रुपयांवर आली आहे.
टीसीएसचे शेअर्स ४,५९२.२५ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले होते. ते घसरुन सध्या ३,४७८ रुपयांवर दिसत आहे. तेव्हापासून कंपनीच्या शेअर्समध्ये १,११४.२५ रुपयांची घसरण झाली आहे. याचा अर्थ कंपनीच्या शेअर्समध्ये २४ टक्क्यांहून अधिक विक्रमी घसरण झाली आहे. गेल्या वर्षभरात कंपनीचे शेअर्स सुमारे १५ टक्क्यांनी घसरले आहेत.
टीसीएसचा दुसऱ्या नंबरचा मान गेलाशेअर्समध्ये घसरण झाल्याने कंपनीच्या मूल्यांकनात मोठी घसरण झाली आहे. कंपनीचा देशातील सर्वात मोठी दुसऱ्या कंपनीचा मान गेला आहे. कंपनीचे मार्केट कॅप १३ लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले. यामुळे कंपनीचा नंबर घसरला असून एचडीएफसी बँक दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे.
शेअर बाजारात का होतेय घसरण?शेअर बाजार घसरण्यामागे अनेक कारणे आहेत. यापैकी महत्त्वाचं कारण म्हणजे परकीय संस्थागत गुंतवणूकदार सातत्याने विक्री करत आहेत. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लावण्याचा इशारा दिल्याने बाजारात भितीचे वातावर आहे. तर भारताच्या जीडीपीची वाढ मंदावल्यानेही बाजारावर नकारात्मक परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत डॉलरच्या तुलनेत रुपया सातत्याने घसरत आहे. या सर्वांचा परिपाक म्हणजे बाजार आतापर्यंत ११ टक्के घसरला आहे.