Gold Silver Prices : पश्चिम आशियातील इराण आणि इस्राईल-अमेरिका यांच्यातील युद्धाचा वणवा पेटल्याने जागतिक बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या किमतींनी सर्व उच्चांक मोडीत काढले आहेत. सलग पाचव्या दिवशी दरवाढीचे सत्र सुरू असून आंतरराष्ट्रीय बाजारात सोने ५,४०० डॉलरच्या ऐतिहासिक स्तरावर पोहोचले आहे. मात्र, या तेजीसोबतच तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना एक धोक्याचा इशाराही दिला आहे. जर राजनैतिक पातळीवर युद्धाचा तणाव निवळला, तर सोन्याच्या किमतीत मोठी 'प्रॉफिट बुकिंग' होऊन दर अचानक कोसळू शकतात.
सोन्या-चांदीची आजची विक्रमी भरारीआंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने ५,३७७ डॉलर प्रति औंसचा टप्पा गाठला आहे. भारतीय बाजारपेठेतही याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. MCX वर १० ग्रॅम सोन्याचा भाव १,७०,००० रुपयांवर पोहोचला. तर चांदीने थेट ३,१५,१०० रुपये प्रति किलो असा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
किमतीत ३ ते ८ टक्क्यांची घसरण शक्य?'INVasset PMS' चे हर्षल दसानी यांच्या मते, ही तेजी केवळ युद्धावर आधारित आहे. जर अमेरिका आणि इराणमधील तणाव कमी झाला, तर सोन्यात ३ ते ५ टक्क्यांची अचानक घसरण होऊ शकते. अधिक अस्थिरतेमुळे चांदीत ५ ते ८ टक्क्यांपर्यंत मोठी पडझड होण्याची शक्यता आहे. मात्र, मध्यवर्ती बँकांकडून होणारी सोन्याची खरेदी आणि डॉलरच्या तुलनेत इतर चलनांचे कमी होणारे मूल्य यामुळे दीर्घकाळात सोने मजबूतच राहील.
डॉलरची मजबूती ठरणार अडथळा?कोटक महिंद्रा AMC चे सतीश डोंडापती यांच्या मते, सध्या जागतिक गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये सोन्याचा वाटा केवळ २-३% आहे, जो वाढण्यास वाव आहे. मात्र, अमेरिकन डॉलर पाच आठवड्यांच्या उच्चांकावर असल्याने सोन्याच्या किमतीवर दबाव येऊ शकतो. जर डॉलर अधिक मजबूत झाला, तर सोन्याच्या वाढीला ब्रेक लागू शकतो.
प्रमुख शहरांमधील २४ कॅरेट सोन्याचे दर (प्रति ग्राम)
| शहर | सोन्याचा भाव (प्रति ग्राम) |
| पुणे/मुंबई/कोलकाता | १७,०५० |
| नवी दिल्ली | १७,०६५ |
| चेन्नई | १७,०८३ |
| नोएडा | १६,२०५ |
वाचा - युद्धामुळे भारतावर उर्जासंकट! देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार? किती साठा शिल्लक?
Web Summary : Gold and silver prices surge due to US-Iran tensions. Experts warn of a potential 3-8% drop if tensions ease, driven by profit booking. Dollar strength could also curb gains, despite strong long-term prospects.
Web Summary : अमेरिका-ईरान तनाव के कारण सोना-चांदी की कीमतों में उछाल। विशेषज्ञों ने तनाव कम होने पर 3-8% गिरावट की चेतावनी दी है, जो मुनाफावसूली के कारण हो सकती है। डॉलर की मजबूती भी लाभ को कम कर सकती है, हालाँकि दीर्घकालिक संभावनाएं मजबूत हैं।