Join us
Daily Top 2Weekly Top 5

घसरत्या बाजारात डिफेन्स शेअर्स करणार श्रीमंत! ब्रोकरेज फर्मकडून ४ कंपन्यांवर 'बाय' रेटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 13:41 IST

Defence Stocks to Buy : यामध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स, हिंदुस्तान एरोनॉटिक्स, भारत डायनॅमिक्स आणि अ‍ॅस्ट्रा मायक्रोवेव्ह यांचा समावेश आहे. ब्रोकरेजच्या मते, या स्टॉकमध्ये सध्याच्या पातळीपेक्षा अंदाजे ३८% वाढ होण्याची क्षमता आहे.

Defence Stocks to Buy : मध्यपूर्वेतील संघर्षाच्या वणव्याने भारतीय शेअर बाजार होरपळून निघत आहे. गेल्या ४ दिवसात गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. पण, दुसरीकडे ही परिस्थिती एक संधी घेऊन आली आहे. भू-राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. आघाडीची ब्रोकरेज फर्म 'मोतीलाल ओसवाल'ने आपल्या ताज्या अहवालात भारतीय संरक्षण क्षेत्रातील चार दिग्गज कंपन्यांच्या शेअर्सवर 'बाय' रेटिंग कायम ठेवले आहे. या शेअर्समध्ये आगामी काळात ३८ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

डिफेन्स सेक्टरमध्ये तेजीची शक्यता का?मोतीलाल ओसवालच्या मते, भारत सरकारचे 'स्वदेशीकरण' धोरण आणि वाढती संरक्षण खरेदी यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांचे भवितव्य उज्ज्वल आहे. जागतिक स्तरावर सुरक्षेची चिंता वाढल्याने भारतीय बनावटीच्या शस्त्रास्त्रांना आणि उपकरणांना मागणी वाढली आहे. पुरवठा साखळीत काही अल्पकालीन आव्हाने असली, तरी पुढील १५-१८ महिन्यांत अनेक मोठ्या ऑर्डर्स फायनल होण्याची चिन्हे आहेत.

ब्रोकरेजची 'टॉप ४' पसंती

कंपनीचे नावटार्गेट प्राईस (रु.)अपेक्षित तेजी
हिंदुस्तान एयरोनॉटिक्स५,५००३८%
भारत डायनेमिक्स१,८००३५%
भारत इलेक्ट्रॉनिक्स५२०१४%
एस्ट्रा मायक्रोवेव्ह १,१५०१५% 

कंपन्यांची स्थिती काय?

  1. हिंदुस्तान एयरोनॉटिक्स : तेजस Mk-1A च्या डिलिव्हरीमुळे कंपनीच्या महसुलात मोठी वाढ अपेक्षित आहे. ध्रुव-एनजी आणि इतर महत्त्वाच्या ऑर्डर्समुळे या शेअरमध्ये सर्वाधिक (३८%) वाढीचा अंदाज आहे.
  2. भारत डायनेमिक्स : कंपनीच्या पाइपलाइनमध्ये ५०,००० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची मोठी ऑर्डर बुक आहे. प्रामुख्याने 'आकाश-एनजी' मिसाइल सिस्टममुळे कंपनीला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
  3. भारत इलेक्ट्रॉनिक्स : शत्रूघात इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि QRSAM सारख्या प्रकल्पांमधून ३०,००० कोटींच्या ऑर्डर्सची अपेक्षा आहे.
  4. एस्ट्रा मायक्रोवेव्ह : इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर प्रकल्पांमध्ये ही कंपनी आघाडीवर असून, आगामी दोन वर्षांत तिचे मूल्य वाढण्याचे संकेत आहेत. 

वाचा - भारतावर गॅस रेशनिंगची वेळ! युद्धाच्या धगीमुळे केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सिलिंडर बुकिंगसाठी नवीन नियम

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : Defence Stocks to Buy: Brokerage Recommends These Four Companies

Web Summary : Amid market volatility, Motilal Oswal suggests buying defence stocks like Hindustan Aeronautics, Bharat Dynamics, Bharat Electronics, and Astra Microwave. Government initiatives and rising global security concerns boost potential growth up to 38%.
टॅग्स :संरक्षण विभागशेअर बाजारस्टॉक मार्केटगुंतवणूकयुद्ध