BSE Top 10 Companies : गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात संमिश्र कल पाहायला मिळाला असला, तरी सेन्सेक्समधील पहिल्या १० पैकी ६ दिग्गज कंपन्यांच्या बाजार भांडवलात ६३,४७८.४६ कोटी रुपयांची घसघशीत वाढ झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने पायाभूत सुविधा क्षेत्रातील दिग्गज कंपनी लार्सन अँड टुब्रो आणि देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय यांनी बाजी मारली आहे.
एल अँड टी आणि बँकिंग शेअर्समध्ये तेजीगेल्या आठवड्यात बीएसईचा ३० शेअर्सचा सेन्सेक्स १८७.९५ अंकांनी (०.२२%) वधारला.
- लार्सन अँड टुब्रो : कंपनीचे मूल्यांकन २८,५२३.३१ कोटींनी वाढून ६.०२ लाख कोटींवर पोहोचले.
- स्टेट बँक ऑफ इंडिया : एसबीआयच्या बाजार मूल्यात १६,०१५.१२ कोटींची भर पडली असून ते ११.२२ लाख कोटी झाले आहे.
- एचडीएफसी बँक : बँकेचे भांडवल ९,६१७.५६ कोटींनी वाढून १४.०३ लाख कोटींवर पोहोचले.
- एलआयसी आणि बजाज फायनान्स : एलआयसीच्या मूल्यात ५,९७७ कोटींची, तर बजाज फायनान्सच्या मूल्यात ३,१४२ कोटींची वाढ झाली.
आयटी क्षेत्राला फटका; एअरटेल-आयसीआयसीआय बँक घसरलीबाजारात एका बाजूला तेजी असताना, दुसरीकडे चार मोठ्या कंपन्यांना मात्र फटका बसला आहे.
- भारती एअरटेल : कंपनीच्या मूल्यांकनात सर्वाधिक १५,३३८.६६ कोटींची घट झाली.
- आयसीआयसीआय बँक : बँकेची बाजार पत १४,६३२.१० कोटींनी कमी झाली आहे.
- आयटी कंपन्या : इन्फोसिस (६,७९१ कोटी घट) आणि टीसीएस (१,९८९ कोटी घट) या दिग्गज आयटी कंपन्यांच्या बाजार भांडवलातही घसरण नोंदवण्यात आली.
रिलायन्स आजही 'नंबर वन'बाजार भांडवलाच्या शर्यतीत मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज १९.२१ लाख कोटींच्या मूल्यांकनासह आजही देशातील सर्वात मोठी कंपनी म्हणून पहिल्या स्थानी कायम आहे.
टॉप १० कंपन्यांचा क्रम:१. रिलायन्स इंडस्ट्रीज२. एचडीएफसी बँक३. भारती एअरटेल४. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)५. आयसीआयसीआय बँक६. टीसीएस (TCS)७. बजाज फायनान्स८. लार्सन अँड टुब्रो९. एलआयसी (LIC)१०. इन्फोसिस
वाचा - एक रकमी गुंतवणूक की दरमहा SIP? शेअर बाजारातील चढ-उतारात तुमची रणनीती काय असावी?
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातीलगुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Indian stock market sees mixed trends. Six of top ten BSE firms gained ₹63,478.46 crore, led by L&T and SBI. Bharti Airtel and ICICI Bank declined. Reliance remains top company.
Web Summary : भारतीय शेयर बाजार में मिश्रित रुझान। एलएंडटी और एसबीआई के नेतृत्व में शीर्ष दस बीएसई फर्मों में से छह को ₹63,478.46 करोड़ का लाभ हुआ। भारती एयरटेल और आईसीआईसीआई बैंक में गिरावट। रिलायंस शीर्ष कंपनी बनी हुई है।